शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने शाळू भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST

गत आठवड्यापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत होता. त्यामुळे शेतकरी आधीच हैराण झाले होते. त्यातच सोमवारी रात्री ...

गत आठवड्यापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत होता. त्यामुळे शेतकरी आधीच हैराण झाले होते. त्यातच सोमवारी रात्री अवकाळी पावसाने परिसरातील शामगाव, अंतवडी, रिसवड, पाचुंद, मेरवेवाडी आदी गावांना झोडपल्याने शाळू पिके भुईसपाट झाली आहेत. शेतकऱ्यांवर अवकाळी संकट कोसळले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाणार आहे. शामगावच्या शिवारातील सुमारे पन्नास टक्के पीक भुईसपाट झाले आहे. तर अंतवडी, पाचुंद, मेरवेवाडी आदी गावांमध्येही नुकसान झाले आहे.

परिसरात यावर्षी पेरणी लवकर झाली होती. तसेच पोषक वातावरणामुळे पिकांची वाढ जोमाने झाली होती. चांगले उत्पन्न मिळणार, या आशेने शेतकरी सुखावले होते. मात्र, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व अपेक्षा धुळीस मिळविल्या आहेत. शामगाव येथील राजेंद्र धर्मा पोळ यांचे सर्व पीक जमीनदोस्त झाले आहे.

- चौकट

माळरानाच्या पिकांसाठी पाऊस पोषक

हा अवकाळी पाऊस माळरानावरील पिकांसाठी वरदान ठरला आहे. माळरानावरील पाणी नसलेले शाळू आता या पावसामुळे जोमाने वाढणार आहेत. परिणामी, माळरानावरील शेतकरी समाधानी आहेत. विभागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

फोटो : ०५केआरडी०५

कॅप्शन : शामगाव, ता. कऱ्हाड येथे अवकाळी पावसाने शाळू पीक भुईसपाट झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत. (छाया : बाळकृष्ण शिंदे)