शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

१९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाची छाया

By admin | Updated: July 6, 2014 23:22 IST

कोयनेच्या पोटात खड्डा :

कोयनेच्या पोटात खड्डा : धरण बांधण्यापूर्वीच्या गावठाणांचे अवशेष उघडे; ‘अतिवृष्टीच्या’ महाबळेश्वरची वनराईही तहानलीसूर्यकांत पाटणकर ल्ल पाटण , पावसाने दडी मारल्यामुळे ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ म्हणून ओळखले जाणारे कोयना धरणही आटले आहे. पावसाअभावी कोयनेच्या उपनद्याही कोरड्या पडल्या असून, धरणातील जलसाठ्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. धरणात फक्त सात टीएमसी पाणी शिल्लक आहे. पावसाची हीच स्थिती कायम राहिल्यास तेही पाणी संपेल आणि महाराष्ट्रावर १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाची परिस्थिती ओढवेल. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांच्या विजेची व सिंचनाची गरज भागविणाऱ्या कोयना धरणात केवळ पंधरा दिवस पुरेल एवढा म्हणजेच सात टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाअभावी धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा पूर्णपणे बंद आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार पूर्वेकडे दररोज अर्धा टीएमसी पाणी सोडावे लागत आहे. एकीकडे पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी सोडावे लागणारे पाणी, पावसामुळे बंद असलेला येवा आणि दुसरीकडे कृष्णा लवादानुसार पूर्वेकडील सांगली पाटबंधारे विभागाला सिंचनासाठी सोडावे लागणारे पाणी यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. आगामी दिवसांत हीच स्थिती कायम राहिल्यास वीजटंचाईसह सिंचनाचाही प्रश्न गंभीर रूप धारण करणार आहे. राज्य शासनाने १९५६ ते १९६२ या काळात जलविद्युत निर्मितीसाठी हा प्रकल्प बांधला. १०५.२५ टीएमसी पाणी साठवणक्षमता असणाऱ्या कोयना प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामधून केवळ १६० मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे, तर १००० मेगावॉट वीजनिर्मिती करणारा चौथा टप्पा पूर्णपणे बंद आहे. आणखी पंधरा दिवस पावसाची स्थिती कायम राहिल्यास कोयना प्रकल्पाची वीजनिर्मिती पूर्ण ठप्प होऊन पूर्वेकडील सिंचनाचा प्रश्न उग्र होऊ शकतो.कोयना धरणाच्या इतिहासात १९७२ आणि १९९५ या वर्षांनंतर यावर्षीच पाण्याची पातळी इतकी खोल गेली आहे. धरणातील खालावत गेलेल्या पाणीपातळीमुळे जुनी गावठाणे उघडी पडली आहेत. जुलै महिन्यात रस्त्यावरून दरवर्षी धरणाचे दिसणारे निसर्गरम्य दृश्य यंदा दिसत नसल्यामुळे जुन्या गावांचे अवशेष पाहून येथील भूमिपुत्र भूतकाळाला उजाळा देत आहेत. त्यांना हे दृश्य काहीसे सुखावणारे असले तरी राज्यातील जनतेच्या डोळ्यात पाणी आणणारे आहे. एरवी धरणाच्या पाण्यातून तरंगत जाणारे ग्रामस्थ धरणातील उघड्या पडलेल्या गावठाणांच्या अवशेषांमधून उड्या मारत जात आहेत. यावरूनच धरणाच्या स्थितीची भीषणता स्पष्ट होत आहे. शिवसागरावर डौलाने डोलणाऱ्या लाँच आणि तराफाही कोरड्या जमिनीवर विखुरलेल्या दिसत आहेत.