शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश

By admin | Updated: February 20, 2016 00:49 IST

लॉजवर छापा : पाच परप्रांतीय युवतींसह दलाल ताब्यात

कऱ्हाड : शहरानजीकच्या नवरंग लॉजवर शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. संबंधित लॉजमधून दोन दलाल, पाच ग्राहकांसह पाच परप्रांतीय युवतींना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू होती. पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर परिसरातील काही लॉजवर वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती उपअधीक्षक शिवणकर यांना मिळाली होती. या माहितीनुसार त्यांनी कर्मचाऱ्यांना लॉजमधील हालचालींविषयी माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या. त्यातून मलकापुरातील नवरंग लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. उपअधीक्षक शिवणकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक नवरंग लॉजवर छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे लॉजमध्ये धावपळ उडाली. मात्र, पोलिसांनी शिवाजी महादेव शेट्टी (रा. मलकापूर) याच्यासह दोन दलाल व पाच ग्राहकांना ताब्यात घेतले. तसेच लॉजमधील खोल्यांची झडती घेतली जात असताना पाच परप्रांतीय युवती आढळून आल्या. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी केली जात होती. याबाबतचा गुन्हा नोंद करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू होते. (प्रतिनिधी)लॉजवाल्यांचे धाबे दणाणलेकऱ्हाडसह मलकापूर परिसरात अनेक लॉज आहेत. तसेच कऱ्हाड-पाटण मार्ग व ओगलेवाडी मार्गानजीकही नव्याने काही लॉज उभी राहिली आहेत. यापैकी काही लॉजवर अनधिकृत व्यवसाय चालविले जात असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, पोलिसांनी कारवाई न केल्याने संबंधित व्यावसायिकांचे फावले होते. शुक्रवारच्या कारवाईमुळे अनेक लॉजवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.