शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
3
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
4
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
5
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
6
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
7
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
8
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
9
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
10
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
11
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
12
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
13
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
14
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
15
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
17
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
18
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
19
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

साताऱ्यात साडे सात लाख ‘बहिणी लाडक्या’!

By नितीन काळेल | Updated: September 6, 2024 20:12 IST

अर्जांची संख्या आठ लाखाजवळ : लाभार्थ्यांमध्ये कऱ्हाड तालुका दीड लाखाच्या उंबरठ्यावर

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी’ योजनेला सातारा जिल्ह्यात प्रतिसाद असून अर्जांची संख्या आठ लाखांजवळ पोहोचली आहे. तर साडे सात लाखांहून अधिक अर्जांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील लाभार`थी महिलांची संख्या १ लाख ४१ हजारांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे जिल्ह्यात योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये येणार आहेत.          

जून महिन्यात राज्य शासनाने अऱ्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी’ योजना जाहीर करण्यात आली. यामध्ये पात्र महिलेला महिन्याला दीड हजार रुपये भेट देण्यात येणार आहे. या अंतर्गत अर्ज नोंदणी करण्यास सुरूवात केली. सातारा जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाने मोहीमेला गती दिली आहे. या मोहिमेत अंगणवाडी सेविकांना सामावून घेऊन गावपातळीवर शासकीय कर्मचाऱ्यांची समिती स्थापन केली. त्यामुळे या योजनेच्या नोंदणीला गती मिळाली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात नोंदणी मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत या योजनेला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. लाखोंच्या संख्येत अर्ज भरण्यात आले आहेत. १५ दिवसांपूर्वीपासून जिल्ह्यातील पात्र बहिणींच्या नावावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करण्यात येत आहेत. आतापर्यंत कोट्यवधी रुपये बहिणींच्या बॅंक खात्यावर जमा झाले आहेत. पण, दररोजच अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या वाढत चालली आहे. बुधवारपर्यंत ७ लाख ८५ हजार ७१ महिलांनी अर्ज केलेला. त्यामधील ७ लाख ५७ हजार ३८५ बहिणींच्या अर्जांना मंजुरी मिळाली होती.

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाSatara areaसातारा परिसर