शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालांच्या प्रलंबित समस्यांबाबत विधिमंडळात लक्षवेधी मांडणार

By admin | Updated: March 29, 2016 00:13 IST

आमदार शंभूराज देसाई

मल्हारपेठ : ‘गेली अनेक वर्षे महसूल विभागात तलाठ्यांचे सहकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या कोतवालांना न्याय मिळावा यासाठी संघटनेमार्फत शासन दरबारी लढा चालू आहे. परंतु अनेकवेळा शासनाकडून नुसती आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे कोतवालांच्या प्रश्नांबाबत विधीमंडळात लक्षवेधी मांडून शासनाकडून योग्य तो न्याय मिळवून देणार आहे,’ असे आश्वासन आमदार शंभूराज देसाई यांनी दिले.पाटण तालुका कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शंभूराज देसाई यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा मिळावा, वेतनश्रेणी ठरवावी, पूर्ण वेळ महसूल लिपिकांचे महसूल सहायक करावे, सेवानिवृत्त कोतवालांना व दिवंगत कोतवालांच्या विधवांना ३ हजार प्रतीमाह निर्वाह भत्ता देण्यात यावा, सध्याचे ५०१० रुपये मानधन न परवडणारे आहे असून ते वाढवावे, अशा मागण्या यावेळी पदाधिकाऱ्यांनी केल्या. कोतवाल हे जनता व प्रशासन यांच्यातील दुवा आहे. महसूल खात्यातील कोतवाल महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, असेही पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. कोतवाल संघटनेचे अध्यक्ष मोहन कवर, कार्याध्यक्ष मिलिंद मस्के, अजित पानस्कर, माधव चव्हाण, प्रवीण उदुगडे, सुनील कांबळे, गणेश पवार, बाजीराव चव्हाण, निवास सुतार, कृष्णत सावंत, किसन जाधव, सूरजकुमार पुजारी, प्रशांत सपकाळ, अरुण जाधव यांच्यासह सर्वच पदाधिकारी व कोतवाल सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)