शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक कार्यकर्त्यांवरील हल्ले घातक : सुनीती

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

‘संत तुकाराम, सॉक्रेटीस गॅलिलिओ यांना सत्याच्या, ज्ञानाच्या कारणासाठी प्राण गमवावे लागले. आज जगात सगळीकडे भूलभुलैय्या आहे.

कऱ्हाड : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले समाजासाठी घातक आहेत. मानवतेकडे जाणे हीच खरी माणुसकी आहे. मानवाधिकार आहे,’ असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र. यांनी केले. येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने आयोजित केलेल्या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, प्रा. डॉ. अमृता देशमुख, उपप्राचार्य डॉ. आत्माराम जगदाळे, प्रा. अजित गाढवे आदी उपस्थित होते. सुनीती सु. र. म्हणाल्या, ‘वंचित लोक, स्त्री, दलित, श्रमिक, आदिवासी, अल्पसंख्यांक आपल्या जगण्याच्या हक्कांसाठी लढत आहेत. पण, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावर अशा राष्ट्रीय चर्चासत्रातून चर्चा व्हायला पाहिजे. दुसऱ्याच्या हक्कावर आक्रमण करून त्याचे माणुसपण हिरावून घेण्याची प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ‘संत तुकाराम, सॉक्रेटीस गॅलिलिओ यांना सत्याच्या, ज्ञानाच्या कारणासाठी प्राण गमवावे लागले. आज जगात सगळीकडे भूलभुलैय्या आहे. निसर्गाने स्वत:ला विकसित केले; पण आपण अजूनही स्वत:ला विकसित करू शकलो नाही. त्यामुळे मानवाधिकार हिरावून घेतले जातात,’ अशी खंत यावेळी प्राचार्य पाटील यांनी बोलताना व्यक्त केली. प्रा. अजित गाढवे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुनील जाधव यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. आत्माराम जगदाळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)