शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात नशा अन् डोळ्यात सेल्फी ! !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:37 IST

हणमंत यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कचाफळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कावळे साद पॉर्इंटवर दारूच्या नशेत खोल दरीत कोसळणाºया दोन तरुणांचा व्हिडिओ एकीकडे व्हायरल झालेला असताना दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळी अशा दुर्घटनेची पुनरावृती होऊ शकते, अशी भीती जिल्ह्यातून अनेकांनी व्यक्त केली आहे.सडावाघापूर, ता. पाटण येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत ...

हणमंत यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कचाफळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कावळे साद पॉर्इंटवर दारूच्या नशेत खोल दरीत कोसळणाºया दोन तरुणांचा व्हिडिओ एकीकडे व्हायरल झालेला असताना दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळी अशा दुर्घटनेची पुनरावृती होऊ शकते, अशी भीती जिल्ह्यातून अनेकांनी व्यक्त केली आहे.सडावाघापूर, ता. पाटण येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. वाहतुकीची चांगली सोय असल्याने येथे येणाºया पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, हुल्लडबाजी करणाºयांची संख्याही येथे लक्षणीय असते. त्यातच या उलट्या धबधब्यावर सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना अनावर होतो. या मोहापायी ते स्वत:चा जीव अक्षरश: धोक्यात घालतात.चाफळच्या पश्चिमेस उंच डोंगर पठारावर सडावाघापूर हे गाव वसले आहे. या गावापासून काही अंतरावर सध्या पर्यटकांना खुणावणारा उलटा धबधबा हे ठिकाण आहे. उंब्रज ते चाफळ मार्गे दाढोली या रस्त्यावरूनही या ठिकाणाकडे जाण्यास पक्क्या स्वरुपाचा डांबरी रस्ता आहे. कास, ठोसेघर, कोयनेपाठोपाठ हा उलटा धबधबा निसर्गप्रेमींचे मुख्य आकर्षण ठरू लागला आहे. हिरवाईने फुललेला हा परिसर अल्पावधीतच पर्यटकांना खुणावू लागला आहे. पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.सध्या या पर्यटनस्थळास हुल्लडबाज तरुणांचे ग्रहण लागले आहे. दारूच्या नशेत गाडीतील गाण्यांवर ही तरुणाई सैराट होताना दिसून येत आहे. बºयाचदा मद्यधुंद अवस्थेत जीव धोक्यात घालून कड्याजवळ धोकादायक परिस्थितीत ही मंडळी चक्क दारूच्या रिकाम्या बाटल्या डोक्यावर घेऊन नाचताना आढळून येत आहेत.ना कुणाची भीती ना कुणाचा अटकाव.त्यामुळे येथे हुल्लडबाज पर्यटकांच्या दंगामस्तीत वाढच होत आहे. याचा त्रास महिला पर्यटकांसह स्थानिक ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. ट्रिपल सीट फिरणे, बेभान होऊन गाड्या चालवणे अशा प्रकारात वाढ झाली आहे.