शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत नव्या सभापतींची निवड

By admin | Updated: March 7, 2016 00:40 IST

राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय : जि.प. उपाध्यक्षांबाबत मौन

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या चारही सभापतींनी राजीनामा दिल्याने या जागेवर इच्छुकांची चाचपणी करून येत्या काही दिवसांत नव्या सभापतींची निवड जाहीर केली जाईल, असा निर्णय रविवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, उपाध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत सदस्यांनी ‘अळीमिळी गूपचिळी’ धोरणच अवलंबिले.जिल्हा परिषदेमध्ये अर्थसंकल्प सभेच्या वेळी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत गटबाजी दिसून आल्याने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अध्यक्षांच्या निवासस्थानी रविवारी दुपारी राष्ट्रवादीची बैठक बोलाविली. या बैठकीत नव्या सभापतींच्या निवडीबरोबरच सदस्यांना ‘गटबाजी न करता एकीने काम करा,’ असा सबुरीचा सल्लाही रामराजेंनी दिला. पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत बंड सुरू झाल्याने राष्ट्रवादीला ग्रहण लागले आहे. इतर सभापतींचे राजीनामे घेतले आहेत; मात्र उपाध्यक्षांच्या राजीनामा लटकल्याने राष्ट्रवादीच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातच जिल्हा परिषद अर्थसंकल्पाची सभा गटबाजीमुळे तहकूब करण्यात आली. एकीकडे बंडखोर शांत झाले असल्याचे दिसत असले, तरी दुसरीकडे त्यांची नाराजी मात्र दूर झालेली दिसून येत नाही. त्यामुळेच रामराजेंनी रविवारी अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक बोलाविली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. राष्ट्रवादीमध्ये गटबाजी अशीच सुरू राहिली तर समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे पहिल्यांदा गटबाजी थांबवा आणि एकीने काम करा, असा सल्लाही यावेळी रामराजेंनी सदस्यांना दिला. (प्रतिनिधी)