शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मयूर पवारची आॅलिम्पिकमधील सायकलिंग सरावासाठी निवड

By admin | Updated: July 1, 2017 13:04 IST

भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा मानस

आॅनलाईन लोकमतमेढा (सातारा) , दि. 0१ : गवडी, ता. जावळी येथील मयूर शशिकांत पवार याची २०२० साली जपान येथे होणाऱ्या आॅलिम्पिक स्पधेर्तील सायकलिंग खेळाच्या सरावासाठी निवड करण्यात आली आहे. आॅलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे.

दरम्यान, आॅलिम्पिक स्पर्धेपर्यंत पोहोचणारा मयूर पवार हा जावळी तालुक्यातील पहिला खेळाडू ठरला आहे. खेळाच्या सरावासाठी स्पोर्ट अ‍ॅथॉरिटी इंडिया (साई) या संस्थेकडून ही निवड करण्यात आली आहे.

जावळी तालुका हा दुर्गम डोंगराळ असला तरीही येथील अनेक व्यक्तींनी आपल्या कायार्चा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रात जावळीचे नाव अभिमानाने घेतले जाते. खडतर परिस्थितीवर मात करून आपला ठसा उमटवण्याचे एक वेगळे वैशिष्ट्य जावळीकरांचे आहे. या वैशिष्ट्याला साजेसा प्रयत्न मयूर पवार याने केला आहे.मयूर पवार सहा वर्षांच्या असताना त्याचे पितृछत्र हरवले. त्यानंतर आईने कष्ट करून मयुरचे शिक्षण पूर्ण केले. मयूरच्या अंगी असलेल्या खेळाडूला त्याचे शिक्षक प्रभाकर धनवडे यांनी प्रोत्साहन दिले. खो-खो, धावण्याच्या स्पर्धेत तालुका जिल्हा व राज्य स्तरावर बक्षिसे मिळवली. यानंतर मयूर याची क्रीडा प्रबोधिनी, मिरज येथे निवड झाल्यानंतर एक वर्ष धावण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्याची बालेवाडी, पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीत निवड झाली. येथे मयूरने मेहनत घेवून सायकलिंग खेळाला महत्त्व देत त्यात प्राविण्य मिळवले. रांची (झारखंड) येथील नॅशनल स्पर्धेत मयूर सहभागी झाला.मयूर पवार याने कर्नाटक राज्यात २०१५ मध्ये झालेल्या नॅशनल स्पर्धेत रौप्य पदक, केरळ व लुधियाना येथे झालेल्या स्पर्धेत दोन सुवर्ण व एक कांस्य पदक मिळवले होते. २०१६ साली तिरुअनंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मयूरने एक सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य पदक मिळवली होती. त्याची ही कामगिरी बघून स्पोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) या नॅशनल सायकलिंग टीम अकॅडमी या संस्थेमार्फत निवड झाली. २०१७ मध्ये मयूर याची दिल्ली येथील ट्रॅक एशियन सायकलिंग या आंतरराष्ट्रीय स्पधेर्साठी निवड झाली. या स्पर्धेत १५ देश सहभागी झाले होते. मयूरची जिद्द व चिकाटी पाहिल्यावर जपान येथे २०२० साली होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवेल, असा विश्वास मयुरची आई सीमा पवार यांनी व्यक्त केला आहे.या यशाबद्दल जावळी पंचायत समितीच्या सभापती अरुणा शिर्के यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य, अधिकारी वर्ग, मयूरची आई सीमा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.