खंडाळा : जागतिक कुस्ती संघटनेच्यावतीने उफा (रशिया) येथे होणाऱ्या जागतिक ज्युनिअर कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून नवनाथ ढमाळ यांची निवड झाली आहे.
१६ ते २२ ऑगस्टअखेर ही स्पर्धा रशियात होणार आहे. स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती महासंघाने पंच म्हणून ढमाळ यांची निवड केली आहे. नवनाथ ढमाळ हे जागतिक कुस्ती संघटनेचे अधिकृत आंतरराष्ट्रीय पंच आहेत. आतापर्यंत त्यांनी आशियाई स्पर्धा, जागतिक कुस्ती स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून निष्पक्षपातीपणे काम पाहिले आहे. ढमाळ हे खंडाळा तालुक्यातील असवली गावचे सुपुत्र असून तेे विद्यमान उपसरपंच आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, तांत्रिक सचिव बंकट यादव, संपत साळुंखे, प्रा. दिलीपबापू पवार, प्रा. दिनेश गुंड, ललित लांडगे, असवली ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
..................