शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

कही पे निगाहे... कही पे निशाना !

By admin | Updated: September 5, 2014 23:22 IST

भाजपला एक‘नाथ’ भेटणार का ?

कऱ्हाड : ‘पुस्तक’ माणसाचं ‘मस्तक’ सुधारतं असं म्हणतात; पण सुधारलेल्या मस्तकाची माणसं असणाऱ्या भाजपनं चक्क मुख्यमंत्र्यांच्या कऱ्हाड दक्षिणेतील पुस्तक चळवळीवरच लक्ष केंद्रीत केलय. मतदारसंघातील ७३ ग्रंथालयांना सुमारे २२ लाखांचा निधी भाजपने दिलाय. वाचन संस्कृती विस्तारासाठी भाजपचा हा चांगला प्रयत्न असला तरी आगामी विधानसभा आणी ‘पृथ्वीराजबाबा’ हेच त्यापाठीमागचे खरे ‘लक्ष्य’ असल्याचे मानले जाते.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कऱ्हाड दक्षिणेत सध्या ‘छप्पर फाडके’ निधीची बरसात सुरू आहे़ रस्ते, सभामंडप, बंदिस्त गटार आदिंसाठी निधीवर निधी पडत असताना, दक्षिणेत कमळ फुलवू पाहणाऱ्या भरत पाटलांनी पक्षाच्या आमदार शोभा फडणवीस यांच्याकडे पाठपूरावा करून जिल्ह्यातील ८३ ग्रंथालयांसाठी सुमारे २५ लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे़ त्यात एकट्या कऱ्हाड दक्षिणेतील ७३ ग्रंथालयांचा समावेश आहे, हे विशेष ! दक्षिणेत सध्या तीन आमदार आहेत़ त्यापैकी एक पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराजबाबा हे राज्याचे मुख्यमंत्री असुन विलासराव पाटील-उंडाळकर व आनंदराव पाटील आपल्या आमदार फंडातून लाखांचा निधी देत असतानाच मुख्यमंत्री चव्हाणांच्या निधीने मात्र कोटींची उड्डाणे घेतली आहेत़ पृथ्वीराज चव्हाणांना निवडणुकीत होम पिचवरच खिळवून ठेवण्याची व्यूहरचना साहजीकच भाजप आखत आहे़ दक्षिणेतून तगडा उमेदवार देण्याबाबत त्यांच्या हालचाली सुरू आहेत. तसे झाले नाही तरी आपल्या उमेदवाराने चांगली झुंज द्यावी म्हणून स्वत: विनोद तावडेंनी लक्ष घातलय म्हणे. म्हणून तर या निधीसाठी ८३ पैकी ७३ ग्रंथालय एकट्या कऱ्हाड दक्षिणमधील निवडल्याचे मानले जाते़ साधारणपणे निधीचे वाटप करताना गट-तट, पार्टी-पक्ष याचा विचार होतो़ पण कमकुवत असणारा दक्षिणेतील भाजप मजबूत करण्यासाठी तसा विचार केलेला दिसत नाही़ मात्र भाजपने ग्रंथालय निधीच्या माध्यमातून पेरलेले ‘शब्दांचे बीज’ निवडणुकीत किती उगवणार हे काळचं ठरवेल़ सध्यातरी या निधीची चर्चा सुरू आहे़ (प्रतिनिधी)भाजपला एक‘नाथ’ भेटणार का ?विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा कऱ्हाडला दोनवेळा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पहिल्यांदा मेळावा आयोजित केला त्यावेळी पदाधिकारी तयारीलाही लागले होते. मात्र, अचानकपणे तो मेळावा रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्यांदा मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. मेळाव्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा पदाधिकाऱ्यांचा मानस होता. मात्र, दुसऱ्यांदा नियोजित मेळावाही रद्द झाला आहे़ त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्यात नाराजीचा सूर असून दक्षिणच्या भाजपला एक‘नाथ’ भेटणार का ? आणि भेटणार असेल तर तो कधी भेटणार ? याबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे़