शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

सैदापुरात चोरट्यांनी दोन घरे फोडली

By admin | Updated: February 2, 2016 00:58 IST

सैदापुरातील घटना : कुटुंबीय विवाहाला जाताच मारला डल्ला

कऱ्हाड : घरातील सर्वजण विवाह समारंभासाठी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी दोन घरे फोडली. संबंधित घरातून सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. सैदापूर येथे रविवारी भरदिवसा ही घटना घडली. याबाबत सागर जगन्नाथ जाधव यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैदापूर येथे वास्तव्यास असणाऱ्या सागर जाधव यांच्या चुलत बहिणीचा विवाह रविवारी दुपारी गजानन हौसिंंग सोसायटीमधील समर्थ मल्टिपर्पज हॉलमध्ये होता. त्यामुळे सागर जाधव यांच्यासह संपूर्ण जाधव कुटुंबीय तसेच आसपासचे लोक घरांना कुलूप लावून हॉलमध्ये गेले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एक नातेवाईक कामानिमित्त घरी आला होता. नंतर तो कुलूप लावून लग्न कार्यालयात गेला. तोपर्यंत सर्व सुरळीत होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विवाह समारंभ आटोपून जाधव कुटुंबीय घरी परतले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा अर्धवट अवस्थेत उघडल्याचे दिसून आले. तसेच कडी-कोयंडा कटावणीसारख्या हत्याराने उचकटल्याचे पाहून घरात चोरी झाल्याची कल्पना सागर जाधव यांना आली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सागर जाधव यांच्यासह त्यांच्या चुलत्याच्या घरातून चोरट्यांनी ७० हजारांच्या रोख रकमेसह साडेसात ग्रॅमची सोन्याची चैन, सहा ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, चार ग्रॅमचे दोन टॉप्स, बारा ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, अंगठ्या असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला आहे. सागर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कऱ्हाड शहर पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)