शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या वर्षीही शंभर लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 22:58 IST

वाठार स्टेशन : मुबलक उसामुळे गतवर्षी पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शंभर लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादनाचा विक्रम केला ...

वाठार स्टेशन : मुबलक उसामुळे गतवर्षी पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शंभर लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादनाचा विक्रम केला होता. हा विक्रम सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी करून गाळप हंगामाचा उच्चांक निर्माण केला.चालू हंगामात उसाची उपलब्धता होती. मात्र, साखर उत्पादनात दुष्काळी परिस्थितीमुळे कमालीची घट झाली. यातच एफआरपी देण्याबाबत द्विधा मनस्थिती राहिल्याने हंगामाचा प्रारंभ उशिरा झाला. मात्र, दैनिक क्षमतेत वाढ झाल्यामुळे गतवर्षीच्या शंभर लाख क्विंटल साखर निर्मितीचा उच्चांक जिल्ह्यातील १५ कारखान्यांनी मोडत ५ एप्रिलअखेर शंभर लाख क्विंटल साखर उत्पादनात मजल मारली आहे.गतवर्षी एफआरपी एकदम न दिल्यामुळे अडचणीत सापडलेला न्यू फलटण शुगर्स वर्कस साखरवाडी हा कारखाना चालू हंगामात बंद राहिला तर याच हंगामात माण-खटाव हा नवीन साखर कारखाना चाचणी गाळप हंगामात कार्यरत झाला. या कारखान्यासह १४ कारखान्यांनी उच्चांकी गाळप करीत शंभर लाख क्विंटल साखर निर्मितीचा टप्पा पार केला.यामध्ये आजअखेर श्रीराम फलटणने ४ लाख ३९ हजार ६८ मेट्रिक टन गाळप करत ५ लाख ५ हजार २६० क्ंिवटल साखर उत्पादन केले. २६ मार्चअखेर गाळप बंद झाले. किसनवीर भुर्इंज कारखान्याने ५ लाख ७७ हजार ९५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करीत ६ लाख २ हजार ३७० क्विंटल साखर उत्पादन घेतले. १६ मार्च रोजी हंगाचा शेवट केला. लो. बा. देसाई पाटण या कारखान्याने १ लाख ९६ हजार ३१५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करीत २ लाख ३० हजार ५७५लाख क्विंटल साखर निर्मिती केली. हा कारखाना १९ मार्चपासून बंद झाला. रयत अथणी कारखान्याने २ लाख ९४ हजार १४० ला मेट्रिक टन गाळप करीत ३ लाख ७५ हजार ४८० क्विंटल साखर उत्पादन पूर्ण करीत १९ मार्च रोजी गाळप हंगामाचा समारोप केला. प्रतापगड कारखान्याने १ लाख ७५ हजार८१२ मेट्रिक टन ऊस गाळप करीत १ लाख ९१ हजार ८६० क्विंटल साखर उत्पादन करीत १५ मार्च रोजी गाळप हंगामाचा समारोप केला. जरंडेश्वर शुगरने १० लाख ०२ हजार ६९३ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करीत १२ लाख ६४ हजार ५८० क्विंटल साखर उत्पादन घेतले.हा कारखाना १९ मार्च रोजी बंद झाला. ग्रीन पॉवर शुगर गोपूज कारखान्याने ४ लाख ४४ हजार ५६६ मेट्रिक टन उसाचे गाळप क रीत ५ लाख १८ हजार ५०० क्ंिवटल साखर उत्पादन घेतले. हा कारखाना ७ मार्चपासून बंद झाला. स्वराज फलटणने ६ लाख ३८ हजार २१३ मेट्रिक टन उसाचे गाळपत पूर्ण करीत ६ लाख १९ हजार ३६० मेट्रिक टन क्विंटल साखर उत्पादन घेतले. १४ मार्च रोजी शेवट झाला. शरयू अ‍ॅग्रोने ७ लाख ८५ हजार ४२४ मेट्रिक टन उसाचे गाळप करीत ९ लाख ३५ हजार ४५० क्ंिवटल साखर उत्पादन घेतले. हा कारखान्याने १६ मार्च रोजी गाळप हंगामाचा समोराप केला.जिल्ह्यातील चार कारखाने अद्याप सुरूचजिल्ह्यातील एकूण नऊ सहकारी व सहा खासगी अशा पंधरा कारखान्यांपैकी दहा कारखाने उसाअभावी बंद झाले आहेत. कृष्णा, सह्याद्री अजिंक्यतारा, जयवंत शुगर्स व खटाव-माण या कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप सुरू आहे. एप्रिलअखेर कारखाने बंद होतील, अशी महिती कारखानदारांनी दिली आहे.