शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ ग्राम’ स्पर्धेत विभागात जखिणवाडीचा दुसरा क्रमांक

By admin | Updated: August 9, 2014 00:28 IST

ग्रामस्थांचा आनंदोत्सव : गावाच्या शिरपेचात आणखी एक तुरा

कऱ्हाड : संत तुकडोजी महाराज ‘स्वच्छ ग्राम’ स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या जखिणवाडी, ता. कऱ्हाड गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गावाने याच स्पर्धेत पुणे विभागामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला असून, निकाल जाहीर झाल्यानंतर गुरुवारी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करून आपला आनंद व्यक्त केला. जखिणवाडी ग्रामस्थांनी स्वच्छतेतील सातत्य व एकीच्या बळावर तंटामुक्त गाव, आदर्श गाव असे अनेक पुरस्कार मिळवले आहेत. तसेच संत तुकडोजी महाराज ‘स्वच्छ ग्राम’ स्पर्धेत या गावाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या गावांना पुणे विभागीय स्पर्धेसाठी संधी मिळते. पुणे विभागीय स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर अशा पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दोन याप्रमाणे दहा गावांचा या स्पर्धेत सहभाग आहे. स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या जखिणवाडी गावाची नुकतीच विभागीय समितीकडून पाहणी करण्यात आली होती. त्याचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. निकालानुसार जखिणवाडी गावाने या स्पर्धेत पुणे विभागामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला असून, आठ लाखांचे बक्षीस मिळवले आहे. या यशाच्या जोरावर जखिणवाडी गाव राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहे. (प्रतिनिधी)दरवर्षी पुरस्कारनरेंद्र नांगरे-पाटील यांनी गावाच्या सरपंचपदाची धुरा सांभाळल्यापासून या गावाने अनेक उपक्रमांत सहभागी होत पुरस्कार पटकावले आहेत. २०१० साली या गावाला निर्मल ग्राम, २०१२ मध्ये तंटामुक्त गाव, २०१३ मध्ये पंचायत राज, वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन, २०१४ मध्ये विकासरत्न, स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम तर विभागात द्वितीय पुरस्कार पटकावला. तसेच गौरव ग्रामसभा स्पर्धेस पात्र ठरल्यामुळे गावाचा लौकिक आणखीनच वाढला आहे.