शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

आला हंगाम.. खतांच्या किंमतीनं फोडला घाम!

By admin | Updated: May 29, 2015 23:56 IST

कुणाचेच नाही नियंत्रण : खरीपाच्या तोंडावर भाववाढ झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी

परळी : यंदा सातारा तालुक्यासह परळी परिसरात ऊस उत्पादनात वाढ झाल्याने बळीराजा ऊसपीक भरणीच्या कामात गुंतला असून खतांची मागणी वाढली आहे. याचा फायदा घेऊन रासायनिक खतनिर्मिती करणाऱ्या कंपन्या, दुकानदार यांनी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खतांचे दर भरमसाठ वाढविल्याने शेतकऱ्यांच्यात नाराजी परसली आहे. वाढीव दरामध्ये शासनाचे नियंत्रण नसल्याने कंपन्यांचे फावत असल्याचा आरोप होत आहे.दरवर्षीच खरीप व रब्बी हंगामात हंगामानुसार लागणाऱ्या रासायनिक खतांच्या दरात वाढ होत असली तरी अलीकडे कंपन्यांचे धोरण बदलले आहे. पंधरा दिवसांच्या टप्प्यांनी दरवाढ सुरू ठेवली आहे. दरवाढीचे निकष काय, कोणत्या कारणांमुळे दरवाढ झाली. याचे उत्तर मात्र कंपन्या व शासकीय यंत्रणेकडून शेतकऱ्यांना देण्यात येत नाही.खरीपात सोयाबीन, भुईमूग, ज्वारी तर रब्बीत गहू, हरभरा, कांदा यांसह भाजीपाला घेतला जातो. महत्त्वाचे म्हणजे खरीपापासूनच शेतीला खऱ्या अर्थाने सुरूवात होते. हाच हंगाम या व्यवसायात महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वी ऊसाला खतांचा डोस द्यावा लागतो. सध्या विक्रेत्यांकडे खतांची मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेऊन कंपन्यांनी किंमत वाढीचे धोरण स्वीकारले आहे. सध्या रासायनिक खताचे पन्नास किलोचे पोते खरेदी करावयाचे झाल्यास शेतकरीवर्गाला अर्ध्या टनाइतके पैसे मोजावे लागत आहेत. वारंवार होणाऱ्या खत दरवाढीवर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जाब कोणाला विचारायचा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. ऊस अथवा कोणत्याही पिकासाठी एकरी खताची मात्रा द्यायची झाल्यास किमान वेगवेगळ्या प्रकारच्या ८ ते १० रासायनिक खतांची आवश्यकता भासते. सध्याचे दर पाहता एकरी १० पोती लागणाऱ्या ठिकाणी केवळ चार ते पाच पोत्यांचीच मात्रा शेतकरीवर्गाकडून दिली जात आहे. सध्या बाजारपेठेत युरिया खताच्या ५० किलो पोत्याचा दर ३३० ते ३५०, सुफला ९०० रूपये, अमोनियम सल्फेट ६५०, पोटॅश ८६०, डीएपी १२९० रूपये दर आहे. महिन्यापूर्वी असलेल्या मूळ दरात वाढ झाली आहे. कंपन्यांनी दरवाढ केल्याने ज्या किरकोळ विक्रेत्यांकडे पूर्वीच्या कमी दराचा कोटा शिल्लक आहे त्याची नवीन आणि जास्त दराने विक्री केला जात आहे. याकडे कृषी खातेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते आहे. मात्र, शेतीची घात चुकवून चालत नाही. यासाठी मुकाट्याने आहे त्या दराने शेतकरी खताची खरेदी करत आहेत. (वार्ताहर)पंधरा दिवसांच्या टप्प्यांनी दरवाढ सुरू दरवाढीची कारणे गुलदस्त्यात शासकीय यंत्रणा चिडीचूप विक्रेत्यांकडे खतांची मागणी वाढलीजाब कोणाला विचारायचा? या चिंतेत शेतकरी कृषी खात्याचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष रासायनिक खत आवश्यकशेतकरीवर्गाकडून कुठल्याही पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर शेणखताची मात्रा हंगामानुसार दिली जाते. याशिवाय ऊसाला पाला-पाचोळा न पेटवता तो जमिनीत तसाच ठेवून सेंद्रिय खताची मात्रा दिली जाते. परंतु केवळ या खतामुळे जमिनीचा पोत सुधारावा यासाठी शेणखताबरोबरंच रासायनिक खतांचीही मात्रा दिली जाते.