शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाच्या अश्लील हावभावप्रकरणी कवठे शाळेला टाळे : ग्रामस्थ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 13:06 IST

खंडाळा तालुक्यातील कवठे येथील एक उपशिक्षक विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबर अश्लील हावभाव करतो, विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करतो, व्यवस्थित न शिकवता गैरहजर राहणे

ठळक मुद्देकारवाई करुन नवीन शिक्षक नेमण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील कवठे येथील एक उपशिक्षक विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबर अश्लील हावभाव करतो, विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करतो, व्यवस्थित न शिकवता गैरहजर राहणे असा आरोप करत संतप्त झालेल्या कवठे ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास शाळेला टाळे ठोकले.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कवठे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीपर्यंत ११२ विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्ञानग्रहण करतात. या ठिकाणी सहा शिक्षक कार्यरत आहेत. उपशिक्षक बाळासाहेब संकपाळ याची सहा महिन्यांपूर्वी आॅनलाईन पद्धतीने नियुक्ती झाली. 

नियुक्ती झाल्यानंतर संबंधित उपशिक्षक विद्यार्थ्यांबरोबर अश्लिल हावभाव करतात, सातत्याने मारहाण करतात, शिकवणे सोडून मोबाईलमध्ये व्यस्त राहतात, अशी तक्रार विद्यार्थ्यांकडून पालकांकडे झाली. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती व सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत खंडाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. 

यावेळी संबंधितांनी केवळ चौकशी करुन संबंधीत शिक्षकावर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत तीन महिन्यांपूर्वी संबंधित शिक्षकाला शाळेत येण्यास बंदी घातली. दरम्यान, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन ग्रामस्थांनी स्वखर्चाने एका खासगी शिक्षकाची नियुक्ती केली. त्यांच्याकडून संकपाळ शिकवत असलेल्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करुन घेतला. यानंतरही संबंधित शिक्षकावर कारवाई होत नसल्याचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी अलका मुळीक, विस्ताराधिकारी गजानन आडे हे केवळ शिक्षकाची चौकशी न करता ग्रामस्थांना आरोप उभे करत होते, अशी तक्रार गटविकास अधिकारी दीपा बापट यांच्याकडे केली. यावेळी गटविकास अधिकारी बापट व प्रभारी गटशिक्षणाधिकारी गजानन आडे व केंद्र प्रमुख मुजावर यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. संकपाळ यांना कवठे येथे रुजू होऊ देणार नाही, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करुन भविष्यात नवीन शिक्षकाचे नेमणूक करू असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी टाळे काढले.