शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांना शाळेतील वीजबिलाचा ‘धक्का’

By admin | Updated: February 26, 2015 00:18 IST

जिल्हा परिषद : अतिरिक्त वीजबिलाची तरतूद नसल्याने बिलाचा करंट

परळी : सर्व शिक्षा अभियानअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांना अनेक विविध शैक्षणिक सुविधा पुरविण्यात आल्या. यात संगणक, टीव्ही यासह अनेक विद्युत उपकरणांचा समावेश आहे. मात्र, या विद्युत उपकरणांमुळे येणारे वीजबिल कसे द्यायचे, हा प्रश्न परळी खोऱ्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना पडला आहे. अतिरिक्त बिल भरण्याची तरतूद जिल्हा परिषदेकडे नसल्याने या बिलाचा धक्का मुख्याध्यापकांना बसत आहे.सातारा तालुक्यात एकूण २५६ शाळा आहेत. त्यामधील सुमारे शंभर शाळा परळी, ठोसेघर, कास परिसरात तसेच अनेक खासगी शाळा आहेत. ही परिस्थिती खासगी शाळा वगळून जिल्हा परिषद शाळांची आहे. जिल्हा परिषद शाळांना येणाऱ्या अतिरिक्त वीजबिलाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. शाळेला उपलब्ध होणारे तुटपुंजे मानधन आणि शाळेचा होणारा वार्षिक खर्च यांचा ताळमेळ शाळेच्या व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागत असताना आता शाळेतील विद्युत बिलाचा मुद्दा हा चांगलाच चर्चेत येऊ लागला आहे. जिल्हा परिषदेमध्ये विद्युत बिल भरण्यासाठी कोणतीही तरतूद नसल्यामुळे या विद्युतबिलाचा धक्का सध्या शाळेच्या मुख्याध्यापकांना बसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या आधुनिक योजना राबवायच्या कशा, हा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला पडला आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेकडून विविध आधुनिक योजनांतर्गत संगणकाने शाळा जोडण्याचे अभियान सध्या तालुक्यात युद्धपातळीवर सुरू आहे. काही वर्षांपूर्वी या योजनेची सुरुवात मोठ्या गाजावाजा करत करण्यात आली होती. पूर्वीच्या काळात काही दानशूर संस्थांच्या माध्यमातून संगणकदेखील उपलब्ध झाले. मात्र, दानात मिळालेले हे संगणक काहीकाळ सुरू राहिले. कारण शाळेला मिळणाऱ्या वार्षिक मानधनात विद्युतबिलाची तरतूद नसल्याने हे वाढीव बिल भरायचे कसे, असा प्रश्न संबंधित शाळेच्या व्यवस्थापनांना पडला आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेत वीजबिलांवरील तरतूद २०१४ पासून बंद झाली आहे. शाळांना पब्लिक सर्व्हिसचा युनिट दर पडत आहे. हा दर प्रतिमहिना १९० रुपये तर प्रतियुनिट ५.४९ पैसे दर पडत आहे. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांना खिशाला कात्री बसत आहे. तरी नवीन २०१५- १६ शालेय वर्षाला वीजबिलाला अनुदान प्रप्त होण्याची शक्यता असून, याबद्दल जिल्हा परिषदेत सभेत विषय मांडणार आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्युत बिलांसाठी स्वतंत्र तरतूद नसल्यामुळे मुख्याध्यापकांना बिलाचा खर्च पगारातून करावा लागत आहे. त्यातच आता शाळेत संगणक आले तर इंटरनेटचा खर्चही करावा लागणार आहे. त्यामुळे या आधुनिकतेचा बोजा आम्ही शिक्षकांनीच सहन करायचा का?- शंकर देवरे, अध्यक्ष, सातारा तालुका शिक्षण संघटना