शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांना शाळेतील वीजबिलाचा ‘धक्का’

By admin | Updated: February 26, 2015 00:15 IST

जिल्हा परिषद : अतिरिक्त वीजबिलाची तरतूद नसल्याने बिलाचा करंट

परळी : सर्व शिक्षा अभियानअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांना अनेक विविध शैक्षणिक सुविधा पुरविण्यात आल्या. यात संगणक, टीव्ही यासह अनेक विद्युत उपकरणांचा समावेश आहे. मात्र, या विद्युत उपकरणांमुळे येणारे वीजबिल कसे द्यायचे, हा प्रश्न परळी खोऱ्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना पडला आहे. अतिरिक्त बिल भरण्याची तरतूद जिल्हा परिषदेकडे नसल्याने या बिलाचा धक्का मुख्याध्यापकांना बसत आहे.सातारा तालुक्यात एकूण २५६ शाळा आहेत. त्यामधील सुमारे शंभर शाळा परळी, ठोसेघर, कास परिसरात तसेच अनेक खासगी शाळा आहेत. ही परिस्थिती खासगी शाळा वगळून जिल्हा परिषद शाळांची आहे. जिल्हा परिषद शाळांना येणाऱ्या अतिरिक्त वीजबिलाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. शाळेला उपलब्ध होणारे तुटपुंजे मानधन आणि शाळेचा होणारा वार्षिक खर्च यांचा ताळमेळ शाळेच्या व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागत असताना आता शाळेतील विद्युत बिलाचा मुद्दा हा चांगलाच चर्चेत येऊ लागला आहे. जिल्हा परिषदेमध्ये विद्युत बिल भरण्यासाठी कोणतीही तरतूद नसल्यामुळे या विद्युतबिलाचा धक्का सध्या शाळेच्या मुख्याध्यापकांना बसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या आधुनिक योजना राबवायच्या कशा, हा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला पडला आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेकडून विविध आधुनिक योजनांतर्गत संगणकाने शाळा जोडण्याचे अभियान सध्या तालुक्यात युद्धपातळीवर सुरू आहे. काही वर्षांपूर्वी या योजनेची सुरुवात मोठ्या गाजावाजा करत करण्यात आली होती. पूर्वीच्या काळात काही दानशूर संस्थांच्या माध्यमातून संगणकदेखील उपलब्ध झाले. मात्र, दानात मिळालेले हे संगणक काहीकाळ सुरू राहिले. कारण शाळेला मिळणाऱ्या वार्षिक मानधनात विद्युतबिलाची तरतूद नसल्याने हे वाढीव बिल भरायचे कसे, असा प्रश्न संबंधित शाळेच्या व्यवस्थापनांना पडला आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्युत बिलांसाठी स्वतंत्र तरतूद नसल्यामुळे मुख्याध्यापकांना बिलाचा खर्च पगारातून करावा लागत आहे. त्यातच आता शाळेत संगणक आले तर इंटरनेटचा खर्चही करावा लागणार आहे. त्यामुळे या आधुनिकतेचा बोजा आम्ही शिक्षकांनीच सहन करायचा का?- शंकर देवरे, अध्यक्ष, सातारा तालुका शिक्षण संघटना जिल्हा परिषदेत वीजबिलांवरील तरतूद २०१४ पासून बंद झाली आहे. शाळांना पब्लिक सर्व्हिसचा युनिट दर पडत आहे. हा दर प्रतिमहिना १९० रुपये तर प्रतियुनिट ५.४९ पैसे दर पडत आहे. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांना खिशाला कात्री बसत आहे. तरी नवीन २०१५- १६ शालेय वर्षाला वीजबिलाला अनुदान प्रप्त होण्याची शक्यता असून, याबद्दल जिल्हा परिषदेत सभेत विषय मांडणार आहे.