कुडाळ : जावळी तालुक्यातील दुर्गम असणाऱ्या गुजरवाडी प्राथमिक शाळेस अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मॅकेनिकल शाखेच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या प्रथमेश निकम, ऋषिकेशघोरपडे, करण शिंदे, वैभव भोसले यांनी शालोपयोगी साहित्य भेट दिले.
यावेळी शिवाजी किर्वे, विलास शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक जाधव आदी उपस्थित होते.
दुर्गम भागातील मुलांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत मदत व्हावी. त्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर व्हाव्यात, या उद्देशाने या विद्यार्थ्यांना आम्ही छोटीशी मदत करीत आहोत, असे प्रथमेश निकम याने सांगितले.
शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या मदतीबद्दल ग्रामस्थ, पालक यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.