शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

दुर्मिळ मांडूळाची तस्करी करणाऱ्याला पकडले

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

भुर्इंज पोलिसांची आनेवाडी टोलनाक्यावर कारवाई

भुर्इंज : मांडुळाची तस्करी करणाऱ्या एकाला येथील आनेवाडी टोलनाक्यावर पकडण्यात पोलिसांना यश आले. तर एकजण पळून गेला. ते दोघे पुण्याहून कऱ्हाडला दुचाकीवरून जात होते. अटक केलेल्या संशयिताने मांडुळाची तस्करी करत असल्याची कबुली पोलिसांकडे दिली असून, यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.याबाबत भुर्इंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आनेवाडी टोलनाक्याहून दुचाकीवरून दोन युवक पुण्याहून कऱ्हाडकडे भरधाव वेगाने निघाले होते. त्यांच्याजवळ असलेल्या बॉक्समध्ये काही तरी असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु न थांबताच दोघेही सुसाट वेगात निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर त्यांची दुचाकी पकडली. मात्र एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी बळीराम गोरख शिंदे (रा. कळंब, जि. उस्मानाबाद) याला पकडल्यानंतर त्याच्याजवळील बॉक्स उघडण्यात आला. त्यामध्ये भले मोठे मांडूळ होते. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मांडूळ पुण्याहून कऱ्हाडला नेत असल्याचे त्याने सांगितले. परंतु तो कऱ्हाडमध्ये मांडूळ कोणाला विकणार होता, हे अद्याप पोलिसांच्या तपासातून समोर आले नाही. जप्त केलेले मांडूळ वनरक्षकांकडे देण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. (वार्ताहर)