शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूबाबाचा शिरवळला पर्दाफाश

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

तिघांना अटक : मूल होण्यासाठी नारायण नागबळी पूजेचा उपाय सांगून ११ हजारांची मागणी

शिरवळ : जादूटोण्याच्या माध्यमातून हमखास मूल देण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शिरवळ पोलिसांच्या मदतीने भांडाफोड केला. येथील एका लॉजवर तो मुक्काम ठोकून होता आणि आपल्या कथित दैवी शक्तीची जाहिरात करीत होता. तुकाराम किसन जोशी-मुके (वय ४८, रा़ वाकोद, ता. जामनेर, जि. जळगाव) असे या भोंदूबाबाचे नाव असून, त्याच्या दोन शिष्यांनाही शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, येथील एका लॉजवर हा कथित तुकाराममहाराज गोंविदा गंगाराम जोशी (२४) व ज्ञानेश्वर शांताराम जोशी (२५) या दोन शिष्यांसमवेत खोली भाड्याने घेऊन गुरुवारी राहण्यास आला होता. आपल्या साथीदाराच्या मदतीने पत्रके छापून ती त्याने वितरित केली होती.या प्रकाराची माहिती ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार यांना मिळाली. त्यानुसार ‘अंनिस’चे कार्यकर्ते भास्कर सदाकळे यांनी एका पत्रकार महिलेसमवेत पती-पत्नी असल्याचे दाखवून बाबाच्या ‘दरबारा’त हजेरी लावली. ‘आम्ही प्रेमविवाह केला असून, आम्हाला मूलबाळ होत नाही,’ असे त्यांनी तुकाराम मुके याला सांगितले. भोंदूबाबा तुकाराम महाराज याने मूल न होण्याचे अतिशय विचित्र कारण सांगितले. नंतर ‘मूल होण्यासाठी नाशिक या ठिकाणी नारायण नागबळीची पूजा करावी लागेल. त्यासाठी आत्ता ११०० रुपये द्या. पूजेकरीता तुमच्या पत्नीला नाशिक येथे एकटीला पाठवावे लागेल. त्या पूजेसाठी ११ हजार रुपये खर्च येईल,’ असे त्याने सांगितले.दरम्यान, याबाबत ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांच्याशी संपर्क साधून कारवाई करण्याची विनंती केली़. त्यानुसार शिरवळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार एस. एस. मोरे, हवालदार रवींद्र कदम, आर. व्ही. सूर्यवंशी, एस. बी. पवार, चंद्रकांत निकम, महिला पोलीस फडतरे, विकास देवकर यांच्या पथकाने संबंधित लॉजवर छापा टाकला. ‘अंनिस’चे कार्यकर्ते प्रशांत पोतदार, भास्कर सदाकळे, संदीप कांबळे, गणेश वायदंडे, सागर कासेगावकर यांच्या मदतीने पोलिसांनी भोंदू तुकाराम महाराजाचा भांडाफोड केला़ दरम्यान, पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)