शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कºहाड परिवहन कार्यालयासमोर घोटाळतोय मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 14:11 IST

कºहाड (जि. सातारा) : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. कºहाड-पाटण रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क केली जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या परिस्थितीकडे पोलिसांसह परिवहनच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष आहे.

ठळक मुद्दे राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा पार्किंगअरूंद रस्त्यावर चालकांची कसरत

कºहाड (जि. सातारा) : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. कºहाड-पाटण रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे वाहने पार्क केली जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या परिस्थितीकडे पोलिसांसह परिवहनच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष आहे.

कºहाड-पाटण मार्गावर वारूंजीफाटा येथून विजयनगरपर्यंत अनेक व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विमानतळ परिसरात सध्या हॉटेल, ढाबे, फर्निचर, विटभट्टी, बांधकाम साहित्य पुरवणारी दुकाने उभी करण्यात आली आहेत. गत काही वर्षांपुर्वी विजयनगर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय थाटण्यात आले. या कार्यालयाचे प्रवेशद्वार कºहाड-पाटण मार्गालगतच आहे. या कार्यालयात दररोज हजारो नागरीक कामानिमित्त येतात. मात्र, कार्यालयासमोर पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरीक आपली वाहने मुख्य रस्त्यावरच पार्क करतात.

वास्तविक, परिवहन कार्यालयामुळे परिसरातील अनेक तरूणांना रोजगारांची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे कार्यालयाच्या परिसरात रस्त्याकडेला हॉटेल, ढाबे, झेरॉक्स सेंटर, ड्रायव्हींग स्कूल, फोटो स्टुडिओ अशी दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे अगोदरच रस्त्याकडेला मोठी गर्दी असते. त्यातच दुकानात व परिवहन कार्यालयात येणाºया नागरीकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली नसल्याने वाहने मुख्य रस्त्यावर उभी केली जात आहेत. वाहने अस्ताव्यस्त उभी केल्याने वादावादीचे प्रसंग घडत असल्याचे दिसून येत आहे. 

परिवहन कार्यालयच्या दोन्ही बाजूस रस्त्याला उतार व वळण आहे. त्यामुळे भरधाव येणारी वाहने परिवहन कार्यालयाच्या परिसरात येताच चालकाला रस्त्यावर गर्दी दिसते. त्यामुळे चालकाचा गोंधळ उडतो. वाहन नियंत्रित करताना त्याला कसरत करावी लागते. रस्त्याकडेला उभी केलेली वाहने व नागरीकांची वर्दळ यामुळे वाहतुकीला अरूंद रस्ता उपलब्ध असतो. अशा परिस्थितीत येथे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिवहन कार्यालयासमोर रस्त्यावर होणारे पार्किंग बंद करण्यात येऊन पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच रस्त्यावर वाहने पार्क करणाºयांवर कारवाई होणेही गरजेचे बनले आहे. सुरक्षात्मक फलकही नाहीत

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात सुरक्षात्मक फलक असणे गरजेचे होते. संबंधित कार्यालय गुहाघर-पंढरपुर या राष्ट्रीय महामार्गालगत आहे. सुरूवातीला हा मार्ग राज्यमार्ग होता. मात्र, एप्रिल महिन्यात या मार्गाला महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. सुरक्षेच्यादृष्टीने या परिसरात फलक लावणे गरजेचे असताना येथे एकही फलक दृष्टीस पडत नाही.