शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

पौरोहित्यमध्येही आता सावित्रीच्या लेकीची एन्ट्री...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:50 IST

सातारा : देवधर्म, पूजाअर्चा अन् पौरोहित्यमध्ये बहुतांश ठिकाणी पुरुषांचेच वर्चस्व पाहायला मिळते; पण लेक शिकल्यानंतर काय घडू शकते, याचा चमत्कार पाटण तालुक्यात पाहायला मिळतो. सीमा आवारे या कडवे परिसरातील गावांमध्ये कोणतेही शुभकार्य असले तरी धावून जातात. त्या सत्यनारायणपासून सर्व प्रकारची पूजा करतात.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची कवाडं उघडी करून ...

सातारा : देवधर्म, पूजाअर्चा अन् पौरोहित्यमध्ये बहुतांश ठिकाणी पुरुषांचेच वर्चस्व पाहायला मिळते; पण लेक शिकल्यानंतर काय घडू शकते, याचा चमत्कार पाटण तालुक्यात पाहायला मिळतो. सीमा आवारे या कडवे परिसरातील गावांमध्ये कोणतेही शुभकार्य असले तरी धावून जातात. त्या सत्यनारायणपासून सर्व प्रकारची पूजा करतात.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची कवाडं उघडी करून दिली. सावित्रीच्या लेकी बदलत्या काळानुसार प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवत आहेत. त्यातून आता पौरोहित्यही सुटू शकले नाही.खटाव तालुक्यातील भूषणगड येथील सीमा फडणवीस यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. त्यांचा कडवे बुद्रुक येथील संतोष आवारे यांच्याशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला. माहेरी वडील पूजाअर्चा करत असत. सासरच्या घरीही पौराहित्य करण्याची परंपरा होती. कडवे परिसरातील गावांची विभागणी झाली अन् सासºयाच्या वाटणीला कडवे बुद्रुक, कडवे खुर्द, जगदाळवाडी, घाटेवाडी ही गावे आली. परंतु पतीचे फारसे शिक्षण न झाल्याने कहाणी वाचताना त्यांना अडचणी येत. त्यामुळे ते पूजा करण्यासाठी जात नसत; पण सीमा या सासºयांबरोबर जात असत. तेथे गेल्यानंतर केवळ बसून निरीक्षण करून त्या पूजा करण्याची पद्धत पाहायच्या.सासºयांचे निधन झाल्यानंतर चालत आलेली परंपरा खंडित होऊ नये म्हणून सीमा आवारे स्वत: पुढे आल्या. परिसरात कोणाच्या घरी शुभकार्य असले तर त्या स्वत: पूजा, मंत्र पठण, आरत्या म्हणतात. लग्न असल्यास भावाला मदतीला बोलावतात. परंपरागत चाकोरी मोडून एक महिला पूजा करते, हे पाहिल्यानंतर सर्वांचेच डोळे विस्फारतात; पण स्वागतही केले जाते, असे त्या अभिमानाने सांगतात.सीमा आवारे या केवळ पौरोहित्यातच रमलेल्या नसून त्यांनी विज्ञानाचा मार्गही धरला आहे. गावातच राष्ट्रीयकृत बँकेचे टेलिमशीन चालवतात. पॅनकार्ड, आधार कार्ड काढण्याचे आॅनलाईन पद्धतीने काम करतात.