शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

महाविकास आघाडीतील सर्वांचाच ‘सवता सुभा’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ६५० हून अधिक ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत असून अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील ६५० हून अधिक ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत असून अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी सवता सुभा मांडला आहे. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी हे सर्वजण एकमेकांच्याच विरोधात लढणार आहेत तर भाजपही तयारीत आहे. या निवडणुकीची चुरस जिल्ह्यातील सर्वच ११ तालुक्यांत आहे.

जिल्ह्यात १४९० हून अधिक ग्रामपंचायती आहेत. त्यामधील डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ८७८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. जवळपास ६० टक्के ग्रामपंचायतींची निवडणूक एकाचवेळी होत असल्याने सर्वच पक्ष ताकदीनिशी उतरलेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व आहे. अनेक संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समित्या ताब्यात आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असलेतरी जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे आघाडीतील एकीचे वारेच वाहिले नाहीत.

जिल्ह्यात ८७८ ग्रामपंचायतींपैकी १२३ ठिकाणची निवडणूक पूर्णत: बिनविरोध आहे तर ९८ ग्रामपंचायतींची निवडणूक अंशत: बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे ६५४ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे तर काही ठिकाणी तिरंगी सामना रंगत आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष बहुतांशी ठिकाणी स्वतंत्र लढत आहेत. अपवादात्मक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली आहे. शिवसेनाही स्थानिक गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलीय तर भाजपही अनेक ठिकाणी अस्तित्व दाखवत आहे. त्यामुळे ही निवडणूक आणखी चुरशीची झाली आहे.

पाटण तालुक्यात नेहमीप्रमाणे पाटणकर विरोधात देसाई गटातच राजकीय द्वंद्व आहे. दोन्ही गटांत नेहमीच काँटे की टक्कर होते. आताही ही निवडणूक चुरशीची होईल तर काँग्रेस आणि भाजपही कमी ठिकाणी रिंगणात आहे. माण तालुक्यात ९० टक्के ठिकाणी दुरंगीच सामना होईल. स्थानिक पातळीवरील गटात ही निवडणूक होत आहे. तालुक्यात महाविकास आघाडीचे वारे नाही. कोरेगाव तालुक्यातही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप रिंगणात आहेत. काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत समोरासमोर सामना आहे.

खंडाळा तालुक्यात बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादीच्या विरोधात इतर पक्ष एकत्र आले आहेत. भाजप आणि शिवसेनाही मैदानात आहे. तालुक्यात महाविकास आघाडी नाही. फलटणमध्ये राजे विरोधात खासदार गट अशीच निवडणूक होत आहे. पण, राजे गटाची ताकद अधिक आहे. खटाव तालुक्यात बहुतांशी ठिकाणी दुरंगी लढत आहे. तर मोठ्या काही गावांच्या ठिकाणी काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी अशी लढत आहे. भाजप आणि शिवसेनाही काही ठिकाणी गटातून निवडणूक लढवत आहे.

सातारा तालुक्यात राजे गटाचीच चलती राहणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींची निवडणूक सातारा तालुक्यातच होत आहे. कऱ्हाड तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच अधिक करून सामना आहे. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट आहे. जावळी तालुक्यात काही ठिकाणी बिनविरोध निवड झाली असलीतरी अटीतटीचा सामना आहे. महाबळेश्वरमध्येही दुरंगी लढत होत आहे.

चौकट :

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे चित्र

निवडणूक लागलेली ग्रामपंचायत संख्या - ८७८

पूर्णता बनिविरोध झालेल्या ग्रामपंचायती - १२३

अंशत: बिनविरोध ग्रामपंचायतींची संख्या - ९८

ग्रामपंचायतींसाठी निवडून जाणारे सदस्य - ७२६६

बिनविरोध निवडून आलेली सदस्यसंख्या - २६३१

प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रामपंचायत संख्या तालुकानिहाय...

सातारा तालुका ९०, कऱ्हाड ८७, पाटण ७२, कोरेगाव ४९, वाई ५७, खंडाळा ५०, महाबळेश्वर १२, फलटण तालुका ७४, जावळी ३७, माण ४७ आणि खटाव तालुका ७७.

.............................................................