शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

‘सातारी बाजीरावां’मुळे ‘फिल्मी मस्तानी’ त्रस्त!

By admin | Updated: October 9, 2015 23:39 IST

वाईत चित्रीकरणाचा सेट : साताऱ्यामधील गुंडांच्या दंडेलशाहीमुळे फिल्म निर्माता ‘पॅकअप’च्या तयारीत

पांडुरंग भिलारे -- वाई  -चित्रपटाच्या चित्रीकरणासाठीचा ‘हॅपनिंग स्पॉट’ अशी ओळख असणाऱ्या वाई तालुक्यात आता गुंडगिरी बोकाळली आहे. गुरूवारी साताऱ्यातील काही गुंडांनी दमदाटी करत बाजीराव मस्तानीच्या सेटवर दंडेलशाही करण्याचा प्रयत्न केला. यापुवीर्ही अशा घटना घडल्याने चित्रीकरणाची पंढरी असणारा वाई तालुका बदनाम होत असून स्थानिकांसह तालुक्यातील व्यवसायिकांचे लांखो रूपयांचे नुकसान होत आहे. दसवडी ता. वाई येथे गेले काही दिवसापासून बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. गुरुवारी साताऱ्यातील काही गुुंडांनी चित्रपटाचा निमार्ता व दिग्दर्शक यांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला. चित्रकरणात सहभागी असणारे वाई व परिसरातील युवकांनी विरोध केल्याने मोठा अनर्थ टळला. सहयाद्रीच्या कुशीत वसलेला वाई शहर व परिसर हा अतिशय निसर्गरम्य आहे. वाईला दक्षिण काशी संबोधले जाते त्यामुळे कृष्णा नदीवर असणारे सात घाट, महागणपती मंदीर, मेणवलीचा वाडा, घाट , धोम धरण तसेच पश्चिम भागातील नयनरम्य परिसर यामुळे सर्व भाषामधील चित्रपट निर्मात्यांना या परिसराची नेहमीच भुरळ पडत आलेली आहे. गेल्या अनेक वषार्पासून या परिसरात विविध चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे. त्यामध्ये मृत्युदंड, गंगाजल, जिस देश मे गंगा रहता है, स्वदेश , दंबग, चैनई एक्सप्रेस, असे अनेक हिंदी, मराठी , तमिळी, भोजपुरी भोषेतील चित्रपट तसेच हिंदी, मराठी मालीका जाहिरातींचे चित्रीकरण झाल्याने हा परिसर चित्रपट सृष्टीसाठी चित्रिकरणांचे महत्वाचे ठिकाण चित्रपट नगरी म्हणून नावारूपास आला होता. विविध चित्रिकरणांमुळे शहरातील हॉटेल्स-लॉज, वहानधारक, कॅटर्स, विविध गांवाच्या ग्रामपंचायतींना मिळणारा महसूल तसेच स्थानिक नागरीकांना मिळत असणारा रोजगार हा मोठया प्रमाणात उपलब्ध होत असे.मात्र, काही लोकांच्या वैयक्तीक स्वाथार्साठी चित्रीकरणाला वेठीस धरण्यात आले. त्यामुळे या परिसराचे नाव बदनाम झाले व या गुंडप्रवृत्तीच्या लोंकाना कटांळून चित्रपट सृष्टीने गेले काही दिवस या परिसरात चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेतला. वाई शहरासह परिसरातील लोंकाचा हातचा रोजगार जावून व्यवसायिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. अनेक खंडानतंर वाईच्या पश्चिम भागात बाजीराव मस्तानी सारख्या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण आले होते. ते काही गुंडप्रवृत्तीच्या लोंकामुळे बंद पडणार असल्याची चर्चा परिसरात आहे. चित्रपट निर्मात्याची या चित्रीकरणाचा सेट दुस-या ठिकाणी हलविण्याची मानसिकता झाली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून वाई तालुक्यासाठी बदनामी कारक आहे. तरी जिल्हा पोलिस प्रशासन , लोकप्रतिनिधींनी वेळीच गुंडप्रवृत्तींना आवर न घातल्यास वाई तालुक्यातील चित्रीकरण कायमचे बंद होण्याच्या मार्गावर आहे. चित्रीकरणाला संरक्षण देण्याची गरजवाई व परिसरात मोठया प्रमाणावर होणारे चित्रीकरण काही मुठभर लोकांच्या वैयक्तीक स्वाथार्मुळे बंद पडण्याच्या मार्गावर असून स्थानिक नागरीकासह व्यवसायिकांचे लाखों रूपयांचे नुकसान होत आहे तरी पोलिस प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तालुक्यात येणा-या चित्रीकरणाला संरक्षण देण्यात यावे असे मत स्थानिक व्यवसायिकांनी बोलून दाखविले.राजकीय पक्ष, संघटनांच्या नावाने गुंडगिरी या परिसरात अनेक वेळा चित्रीकरणाच्या वेळी चित्रीकरणासाठी लागणारे सर्वप्रकारचे ठेके मिळणे, पैशाची मागणी विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या नावाखाली मागणी केली जात आहे.वाई शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी यापूर्वी चित्रपटांचे चित्रीकरणातून स्थानिकांना रोजगार मिळतो. चित्रीकरण पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.- संतोष तांबे, सरपंच, मेणवली.