शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या अधिकाऱ्यांना मुंबईत ‘त्रिवार’ सलाम !

By admin | Updated: April 20, 2016 23:33 IST

उत्कृष्ट कार्य: अश्विन मुदगल, अभिजित बापट, विद्या पोळ यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

सातारा : विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट व पाचगणी पालिकेच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे नागरी सेवा दिनानिमित्त मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यासह सातारा जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे, उद्योगमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीना आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, ‘सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे माध्यम म्हणून लोकशाहीमध्ये प्रशासन कार्यरत असते. सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या मनातील महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. (प्रतिनिधी)