शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणाच्या नेत्यांना साताऱ्याची भुरळ !

By admin | Updated: April 13, 2016 00:11 IST

योजनांची घेतली माहिती : अधिकाऱ्यांकडून पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे उपक्रमाची माहिती

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमशील योजनांची भुरळ तेलंगणा या नव्याने निर्माण झालेल्या राज्यातील राजकारण्यांना पडली. निमित्त होतं यशदामार्फत आयोजित केलेल्या भेटीचं. तेलंगणा राज्यातील नाडगौंडा जिल्हा परिषदेतील सदस्यांचे शिष्टमंडळाच्या जिल्हा परिषदेला दिलेल्या भेटीचं!केंद्र शासनाच्या योजनेत सातारा जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत संपूर्ण देशातील पंचायत राजमध्ये काम करणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी व कार्यकर्त्यांना उत्सुकता लागलेली आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर याठिकाणी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली आहे. या व्यवस्थेत काम करणारे सदस्यही नवीन आहेत. महाराष्ट्रात या व्यवस्थेने चांगले मूळ धरले आणि येथील व्यवस्था उत्तम पद्धतीने चालली आहे. त्यातही साताऱ्याचा आदर्श घेण्यासारखा आहे. महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने सुरू असलेल्या या कामाची पाहणी करून त्याप्रमाणे आपापल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींमध्ये योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण तेलंगणा राज्याचे आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी मंगळवारी आलेल्या या पथकाचे स्वागत केले. शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सतीश चव्हाण यांचीही यावेळी उपस्थिती होती. स्थायी समितीच्या सभागृहामध्ये या पथकातील ४० सदस्यांना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे एन. एल. खाडे इतर अधिकाऱ्यांनी पॉवर पॉइंट पे्रझेंटेशनद्वारे संबंधित पथकाला माहिती देण्यात आली. साताऱ्यातील बचतगट चळवळ, सेंद्रिय शेतीचा प्रयोग, पाणी बचतीसाठी केलेली उपाययोजना आदींची माहिती यावेळी देण्यात आली. यानंतर या पथकाने जिल्हा परिषदेतील विविध विभागांत जाऊन कामकाजाची माहिती घेतली. (प्रतिनिधी)प्रश्नोत्तराचा तासतेलंगणाच्या पथकातील सदस्य उत्सुकतेपोटी अनेक प्रश्न विचारत होते. सर्व सदस्यांना काम करण्यासाठी किती निधी दिला जातो आदी प्रश्नांना सातारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. जाखणगावची पाहणीखटाव तालुक्यातील जाखणगाव या दुष्काळी गावाने लोकसहभागाच्या जीवावर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळविली आहे. कायम दुष्काळी समजल्या जाणाऱ्या या गावात आता बागायती शेती केली जाते. या गावची पाहणी करण्यासाठी दुपारनंतर हे पथक रवाना झाले. हिंदीतून संभाषणसातारा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना मराठीत संभाषण करण्याची सवय; मात्र तेलंगणाच्या पथकातील सदस्यांना मराठी समजत नसल्याने अधिकाऱ्यांना हिंदीतून माहिती सांगावी लागली. अधून-मधून इंग्रजी भाषेचा वापरही केला जात होता.