शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राजेंच्या मनोमिलनाच्या दुसऱ्या अध्यायाची सत्त्वपरीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:25 IST

सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : तालुक्यातील बहुसंख्य राजकीय संस्थांवर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : तालुक्यातील बहुसंख्य राजकीय संस्थांवर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व आहे. या दोघांतील संघर्ष साहजिकच दोन्ही गटांच्या कार्यकत्यांमध्येही भिनलेला आहे. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही राजांच्या पुन्हा झालेल्या मनोमिलनाची खरी सत्त्वपरीक्षा लागणार आहे.सातारा शहरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सातारा विकास आघाडी सत्तेत आहे. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील नगर विकास आघाडी प्रमुख विरोधक आहे. सातारा विकास आघाडीचे २२, नगर विकास आघाडीचे १२ व भाजपचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. मनोमिलनापूर्वी शिवेंद्र्रसिंहराजे यांच्या गटाच्या भूमिकेविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, आता त्यांनी आपली भूमिका राष्ट्रवादीचे उमेदवार व त्यांचे बंधू उदयनराजे यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपचेही सातारा पालिकेत ६ नगरसेवक आहेत. ते साहजिकच शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठी काम करतील.संपूर्ण सातारा तालुक्याच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर परळी, लिंब, पाटखळ, शेंद्र्रे, गोडोली या पाच जिल्हा परिषद गटांत शिवेंद्र्रसिंहराजे गटाची सत्ता आहे. शाहूपुरी, कोडोली, नागठाणे या तीन गटांत उदयनराजे यांचे वर्चस्व आहे. तर वर्णे या गटात भाजपचे मनोज घोरपडे यांचे प्राबल्य आहे. या गटात मनोज घोरपडे यांच्यासह पंचायत समितीला संजय घोरपडे हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले. वनवासवाडी गटामधून भाजपचा सदस्य निवडून आला आहे.लिंब गटातून प्रतीक कदम, जितेंद्र सावंत, सरिता इंदलकर, पाटखळमधून वनिता गोरे, राहुल शिंदे, दयानंद उघडे शाहूपुरीतून अनिता चोरगे, संजय पाटील, वसुंधरा ढाणे, कोडोलीतून अर्चना देशमुख, रामदास साळुंखे, रेखा शिंदे, परळीतून कमल जाधव, विद्या देवरे, अरविंद जाधव, शेंद्रेतून शिवाजीराव चव्हाण, छाया कुंभार, हणमंत गुरव, नागठाणेतून भाग्यश्री मोहिते, विजया गुरव, बेबीताई जाधव, गोडोलीतून मधू कांबळे, मिलिंद कांबळे, आशुतोष चव्हाण अलका बोभाटे या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्य यांना कामाला लागण्याच्या सूचना दोन्ही राजेंनी नुकत्याच झालेल्या मेळाव्यात दिल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या एका गटात सर्वसासाधारण ४० हजार मतदान असते. त्यामुळे हे मतदान निर्णायक ठरणार आहे. तालुक्यातून जादाचे मताधिक्य मिळवण्यावर उदयनराजे भोसले यांचा प्रयत्न राहणार आहे.वर्णे गटातील भाजपचे सदस्य मनोज घोरपडे हे कºहाड उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा तयारी करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत युतीच्या नरेंद्र पाटील यांना आपल्या भागातून किती आघाडी मिळवून देणार? यावर त्यांच्या विधानसभा निवडणुकीचे भविष्य अवलंबून असल्याने तेही ताकदीने कामाला लागले आहेत.तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती दोन्ही राजेंचे नेतृत्व मानणाऱ्या आहेत. मात्र दोन राजेंतील टोकाचा संघर्ष त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनुभवला असल्याने त्यांची अजूनही दोलायमान स्थिती आहे.वनवासवाडीत पक्षकार्य की राजेनिष्ठा ?खासदार उदयनराजे भोसले यांचे नेतृत्व मानणारे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य संदीप शिंदे यांनी मागील जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा झेंडा हाती घेतला होता. त्यांच्या पत्नी रेश्मा शिंदे वनवासवाडी गटातून भाजपच्या चिन्हावर जिल्हा परिषदेत निवडून गेल्या आहेत. संदीप शिंदे हे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात उतरले आहेत. त्यांच्या पत्नी पक्ष आदेश पाळणार का ? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.