शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाकडून भक्तांची सत्त्वपरीक्षा!

By admin | Updated: December 30, 2014 23:24 IST

घाटरस्ता धोकादायक : भरघोस मतांचा आशीर्वाद देणारी घुमाईदेवी दुर्लक्षित

पिंपोडे बुद्रुक : श्री घुमाईदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या कामात वनविभाग आडकाठी आणत आहे. घाट रस्त्याला संरक्षक कठडे नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली असून या रस्त्याचे डांबरीकरण करून संरक्षक कठडे बांधावेत, अशी भाविकांची मागणी आहे. हे देवस्थान जागृत असल्याने निवडणुका आल्यावर सर्वच उमेदवार व राजकरणी विजयाचे साकडे घालण्यासाठी देवीच्या दर्शनाला जातात. मात्र, अनेकांना या रस्त्याच्या दुरवस्थेचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे.कोरेगाव तालुक्यातील प्रमुख व जागृत देवस्थान म्हणून श्री घुमाईदेवीची ओळख आहे. दरीतील देवीच्या भव्य व आकर्षक मंदिराला चहूबाजूंनी डोंगरानी वेढलेले आहे. याठिकाणी दर मंगळवार आणि शुक्रवारी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. तसेच प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला देवदर्शनासाठी गर्दी होते. पिंपोड्यापासून हे देवस्थान चार किलोमिटरवर आहे. त्यामुळे बहुतांश भाविक दुचाकी, चारचाकी वाहनातुन दर्शनासाठी जातात. गावापासून भावेनगरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट झाल्याने पूर्ण रस्ता उखडला आहे. त्यामुळे खड्यात रस्ता ्रकी रस्त्यात खड्डे हेच कळत नाही. भावेनगर गावापासून ते देवीच्या स्वागत कमानीपर्यंत सुमारे अर्धा किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. मात्र तेथून पुढे एक मिलोमिटरचा कच्चा घाटरस्ता आहे. या रस्त्यावर सर्वत्र अस्ताव्यस्त खडी पसरली आहे. तीव्र उतार व वेडीवाकडी वळणे यामुहे हा रस्ता धोकादायक बनला आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक कठडे नसल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. देवदर्शन निर्धोक होण्याकरिता या रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करून घाटात संरक्षक कठडे बांधावेत अशी भक्तांची मागणी आहे. (वार्ताहर)पिंपोडे बुद्रुक गावापासून देवीच्या मंदिरापर्यंत रस्ता अत्यंत खराब झाला आहे. घाट रस्ता डांबरीकरण करुन घाटात संरक्षक कठडे बांधणे गरजेचे आहे. घाटातून भाविकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. - संतोष सूळसरपंच, भावेनगर केवळ दिवसाच घेता येते दर्शनघुमाईदेविची यात्रा कोजागिरी पोर्णिमेस भरते. यात्रेसाठी भाविक राज्यभरातून मोठ्या प्रमाणात येतात. मात्र घाट रस्ता धोकादायक असल्यामुळे व मंदिर खोल दरीत असल्यामुळे डोंगर माथ्यावर वाहनतळ उभारून तेथून खाली दरीत पायी चालत जावे लागते. याठिकाणी वीजेची सोय नसल्यामुळे संध्याकाळी दर्शनासाठी जाण्यासाठी अडचणीचे होते. त्यामुळे भाविकांना देवीचे दर्शन दिवसा घेवून लगेचच परतीचा प्रवास करावा लागतो. मात्र या समस्येकडे लक्ष यायला कोणालाही वेळ नसल्याचे दिसून येते.