शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

आंतरराष्ट्रीय मोटोक्रॉस स्पर्धेत साताऱ्याची तनिका शानभाग

By admin | Updated: March 15, 2017 22:48 IST

मलेशियात फडकवणार झेंडा : ज्युनिअर गटातील भारतीय पहिल्या मुलीचा मान

सातारा : मलेशियात २३ ते २५ मार्च दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मोटोक्रॉस स्पर्धेसाठी साताऱ्याच्या तनिका शानभाग हिची निवड झाली आहे. ज्युनिअर गटातून निवड झालेली तनिका ही देशातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. स्पर्धेत जगभरातून चाळीसहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.तनिकाने गेल्या वर्षी झालेल्या देशांतर्गत विविध चार स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी बजावली होती. यामध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच सहभाग घेऊन तिने तिसरा क्रमांक मिळवला. याशिवाय जयपूर, पुणे व बेंगलोर येथे तिने स्पर्धेतून चुणूक दाखविल्यामुळे तिची मलेशियातील या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. प्रोफेशनल मोटोक्रॉस, मोटार सायकल चालवत सध्या ती दररोज तासभराहून अधिक काळ शास्त्रीय पद्धतीने सराव करत आहे. (प्रतिनिधी)तिसरी पिढीवडील संकेत शानभाग व आजोबा रमेश शानभाग यांनी यापूर्वी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोटोक्रॉस स्पर्धा व गो कार्टिंग स्पर्धांमधून यश मिळविले होते. हेच बाळकडू तनिकाला मिळाले असून, ती शानभाग परिवारातील तिसरी पिढी म्हणून चमकत आहे. सहा लाखांची गाडी अन् पाच एकरांचा ट्रॅकमलेशियातील स्पर्धेसाठी सुमारे ६ लाख रुपयांची मोटारसायकल ती वापरणार आहे. यासाठी घराजवळील परिसरात तनिकासाठी पाच एकर परिसरात ट्रॅक बनवण्यात आला आहे. या ट्रॅकवर तासभर सराव, दररोज बास्केटबॉल सराव व १० ते १५ किलोमीटर सायकलिंग करत तनिका परिश्रम घेत आहे.