शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

साताऱ्याचा पारा @ 41

By admin | Updated: April 15, 2017 18:39 IST

अंगाची लाहीलाही : कडाक्याच्या उन्हामुळं जिवाचं पाणी पाणी!

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. १५ : साताऱ्यासह जिल्ह्यात सूर्यनारायण आग ओकत असून, शनिवारी तर कहरच झाला आहे. यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४१ अंश सेल्सिअसचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून, वारंवार पाणी पिल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. कडक उन्हामुळे घामावाटे शरीरातील पाणी कमी होत असल्याने सतत तहान लागत आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगा, उंचच उंच रांगा अन् दाट झाडी यामुळे जिल्ह्यातील तापमान कायम थंड असायचे. यामुळे जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी येथील थंड हवेच्या ठिकाणी जगभरातून हौसी पर्यटक भेट देतात. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खाण्देश या भागातील लोकांसाठी महाबळेश्वर म्हणजे जणूकाही सिमला आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून कूल सिटी हॉट सिटी बनायला लागला आहे. जिल्ह्यातील तामपानही ३८ अंश सेल्सिअच्या दरम्यान स्थिरावत असल्याने इतर जिल्हे अन सातारा यांच्यामध्ये फारसा फरक राहिलेला नाही. जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच तापमानात वाढ होत आहे. सर्वसाधारणपणे होळीपर्यंत हिवाळा कायम असतो. होळीत थंडी जळाली की उन्हाळा सुरू असतो, असा आजवरचा समज असायचा; पण यंदा त्यापूवीर्पासूनच कडक उन्हामुळे यंदाचा उन्हाळा कडक असेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तो आत्तापासून खरा होऊ लागला आहे. (प्रतिनिधी)पाऱ्याचा विक्रम

यंदाच्या हंगामात सरासरी ३९ ते ४० अंश सेल्सिअच्या घरात तापमान असायचे; मात्र शनिवारी पाऱ्याने विक्रमच केला. ४१ अंश सेल्सिअसचा पल्ला ओलांडला आहे. यातून महाबळेश्वरही सुटलेले नाही. महाबळेश्वरमधील तापमान सरासरी ३९ अंश सेल्सिअस असल्याचे सांगितले जात होते. सतत पाणी पिण्याचा सल्ला

कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडत असल्याने आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत पाणी पिण्याचा सल्ला दिला वैद्यकीय अधिकारी देत आहेत.