शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात पाणी टंचाईच्या काऊंटडाऊनला सुरुवात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 23:19 IST

पेट्री : सातारा शहरात पाणीटंचाईचे ढग जमा होऊ लागले असून, आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला ...

पेट्री : सातारा शहरात पाणीटंचाईचे ढग जमा होऊ लागले असून, आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहराला पाणीपुरवठा करत असलेल्या कास तलावात केवळ सात फूट चार इंच पाणीसाठा शिल्लक आहे. तलावाचा दुसरा व्हॉल्व्हही उघडा पडला असल्याने पाणीटंचाईचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे मानले जात आहे.सातारा शहराला पाणीपुरवठा करणाºया कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत आहे. पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागली आहे. तलावाचा दुसरा व्हॉल्व्ह उघडा पडला असून, शेवटच्या तिसºया व्हॉल्व्हमधून पाणीपुरवठा सुरू आहे. सद्य:स्थितीला तलावात केवळ सात फूट चार इंच पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा अवकाळी पावसाने ओढ दिली व उन्हाची तीव्रता जास्त असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा तलावात दोन फुटाने पाणीसाठा कमी आहे. वरुणराजा वेळेत बरसला नाही तर सातारकरांची तहान भागविणे जिकिरीचे होणार आहे.साताºयाला कास तलावातील तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यापैकी पहिला व्हॉल्व्ह चार महिन्यांपूर्वीच उघडा पडला होता. त्यानंतर दुसरा व्हॉल्व्हही उघडा पडला आहे. या दुसºया व्हॉल्व्हद्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सर्वात खाली अंतिम तिसºया व्हॉल्व्हद्वारे गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या तिसºया व्हॉल्व्हवरील संरक्षकजाळी पूर्णपणे उघडी पडली आहे.शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे तलावातील पाणीपातळी दररोज सव्वा ते दीड इंचाने कमी होत आहे. पात्रातील जमिनीही उघडी पडल्याचे चित्र दिसत आहे. दिवसभर वातावरणात उष्णता अधिक तीव्रतेने भासत असून, दिवसेंदिवस पाणी पातळी खालावतच चालली आहे. तलावातील मुरून वाया जाणारे पाणी दिवस-रात्र दोन मोटारींच्या साह्याने उपसा करून पुन्हा पाटात सोडले जात आहे.