शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या क्षितिजावर सप्तरंग

By admin | Updated: March 12, 2015 00:08 IST

रंगपंचमी उत्साहात : शहरात बच्चेकंपनी, तरुणाई अन् ज्येष्ठांनीही साजरा केला रंगोत्सव--रंग उमलत्या मनाचा...रंग उसळत्या हर्षाचा...रंग बेधुंद मस्तीचा... रंग चिरंतन सलोख्याचा...

सातारा : रंग आणि उत्साहाचा सण म्हणून रंगपंचमी सर्वत्र साजरी केली जाते. साताऱ्यात यंदा तरुणाईचे, माणुसकीचे अन् सहिष्णूतेचे रंग पाहायला मिळाले.पारंपरिक उत्साहात सकाळपासूनच रंगपंचमीचा धडाका सुरू झाला होता. महाविद्यालयीन युवकांनी सकाळपासूनच रंग खेळण्यास सुरुवात केली होती. डोक्यात अंडे फोडून तर पाण्याच्या डबक्यात परस्परांना डुंबवण्यापर्यंत त्यांनी धुडगूस घातला. त्या तुलनेत युवतींनी महाविद्यालयात कोरडे रंग परस्परांना लावून हा सण साजरा केला. तरुणाईचा हा रंग पाहून सर्वांनाच ऊर्जा मिळाली.रंगांचा हा उत्सव साजरा करताना गरीब, श्रीमंत असा भेदभाव राहत नाही. म्हणूनच आपल्या परीने मिळेल तो रंग परस्परांना लावून झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या चिमुरड्यांनीही त्यांच्या परीने हा सण साजरा करून आनंद लुटला. त्यांना आनंदाने नाचताना पाहून संवेदनशील मन हेलावले.जिल्ह्यात एका ठिकाणी काही दिवसांपूर्वी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली होती; पण त्या कटू आठवणी मागे टाकत दोन्ही समाजातील व्यक्तींनी परस्परांना रंग लावून जाती धर्मा पलीकडेही सहिष्णूतेची जपणूक करणारे सातारकर असल्याचा असा संदेश दिला. (प्रतिनिधी)चिमुकल्यांची धूम...तरुण आणि मोठ्यांच्या धबडग्यात चिमुकल्यांनीही रंगपंचमी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. फुगे आणि पिचकारी याबरोबरच परस्परांच्या अंगांवर पाणी ओतून त्यांनी आनंद साजरा केला. घराच्या परिसरात खेळणाऱ्या या मुलांवर लक्ष ठेवता-ठेवता कुटुंबीयांची मात्र त्रेधा उडाली.