सातारा : ‘लोकमत सखी मंच’च्या फलटण येथील सखी सदस्यांसाठी शनिवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सांस्कृतिक भवन, फलटण येथे ‘हास्य षटकार’ हा विनोदी कार्यक्रम आयोजित केला आहे. दिलीप हल्याळ आणि मृदूला मोघे यांच्या अभिनयाचा ‘उत्तुंग आविष्कार’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहण्याची संधी सखींना मिळणार आहे. दिलीप हल्याळ आणि मृदूला मोघे सखींना मनमुराद हसविणार आहेत. आपल्या खुमासदार अभिनयाचे विनोदी किस्से सादर करणार आहेत. कार्यक्रमाच्या मध्यंतरात चंदुकाका सराफ यांच्यामार्फत सुवर्ण नथ आणि सखी ब्युटी पार्लरमार्फत मोफत फेशियल्सचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. लकी ड्रॉ साठीचे कूपन २१ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले जाणार आहे.जास्तीत जास्त सखींनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)साताऱ्यात रविवारी हॅन्डरायटिंग इम्प्रुमेंट कॅम्पइशा स्कूल अॅण्ड एज्युकेशन सेंटरच्या वतीने रविवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत हॅन्डरायटिंग इम्प्रुमेंट कॅम्प आयोजित केला आहे. या कॅम्पमध्ये कोणत्याही वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकते. फक्त ३० रुपये इतके नाममात्र शुल्क भरून दीड ते दोन तास प्रशिक्षण घेता येईल. फक्त पेन्सिल किंवा पेन आणि राइटिंंग पॅड सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. ‘लोकमत’या कम्पचे माध्यम प्रायोजक असून सखी मंच, बालविकास मंच व युवा नेक्स्टच्या सभासदांसाठी फक्त १० रुपये प्रवेश फी आकारण्यात येईल. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी ९९२२२४९९१४, ८८०५९८९९०८, ९७६२५२७१०९ या क्रमांकावर संपर्क साधावा.विनोदाच्या या हास्य षटकाराचे प्रायोजकत्व प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी आणि प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट यांनी स्वीकारले आहे.
फलटणच्या सखींसाठी शनिवारी ‘हास्य षटकार’
By admin | Updated: November 21, 2014 00:30 IST