शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारचा दिवस चक्क दप्तराविना!

By admin | Updated: June 22, 2016 00:09 IST

प्रयोग चाकोरीबाहेरचा : अहिरे शाळेत एक दिवस अवांतर वाचनासाठी

दशरथ ननावरे -- खंडाळा  -शिक्षण क्षेत्रातही खासगी शाळांचे प्रस्थ वाढत असताना जिल्हा परिषदेच्या खंडाळा तालुक्यातील अहिरे प्राथमिक शाळेने गुणवत्तेसह विविध उपक्रम राबवून वेगळा ठसा उमठविला आहे. बालवयात वाचनाची गोडी लागावी यासाठी दर शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम राबविला जातो. सकाळच्या वातावरणात मनोरंजक, साहसी गोष्टींबरोबरच सामान्य ज्ञानावर आधारित पुस्तकांमध्ये मुलं रममान झालेली पाहायला मिळतात.अहिरे प्राथमिक शाळेने ज्ञानरचना वादाचा पुरस्कार करून आनंददायी शिक्षणाने सुसंस्कारीत मुले घडविणाऱ्या या जगावेगळ्या शाळेत शैक्षणिक आणि बालसंस्कारावरील चित्रपट दाखवून उज्ज्वल भविष्याचा पाया रचला जात आहे. नियोजित पाठ्यक्रमातील अभ्यासाव्यतिरिक्त ई लर्निंगचा प्रभावी वापर केल्याने विद्यार्थ्यांच्या बौद्धीकतेत सुधारणा झाली. तर ज्ञानरचना वाद अध्यापन पद्धतीने मुले आता स्वत: शिकू लागली आहेत. कॉन्व्हेंटच्या शाळेसारखे विद्यार्थ्यांचे गणवेश, शिस्तबद्ध प्रशासन, शाळेच्या परिसरात फुललेली बाग म्हणजे वेगळे वैशिट्य ठरले आहे. खेळाचे आधुनिक मैदान आणि मनोरंजक खेळणीने विद्यार्थ्यांचा सुटीचा वेळही आनंदमय जातो. लोकसहभाग आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने शाळेने प्रगतिपथावर वाटचाल केली आहे. बोलके व्हरांडे, प्रत्येक वर्गातील रंगरंगोटी, शैक्षणिक साहित्यांची भरभराट, फरशीवरही अध्यापन-अध्ययन पेटिंग, परिपाठातून मूल्यसंस्कार असे एक ना अनेक गोष्टींनी शाळा परिपूर्ण बनलेली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा ओढा या शाळेकडे वाढला आहे. उपक्रमांची चाळीशीएक हजार झाडांची बाग, परसबागेत औषधी वनस्पती, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, प्रत्येक वर्गात सॉफ्टवेअरसह संगणक उपलब्ध, आदर्श परिपाठ व गीतमंच, उत्कृष्ट नृत्य मार्गदर्शन, ज्ञानकुंभ, कलादालन, राजकुमार-राजकुमारी निवड, प्रत्येक वर्गात साऊंड सिस्टीम, सेमी इंग्लिश अध्यापन, सणाला संस्कृतीदर्शन, परिसर भेट, स्पर्धा परीक्षा यासारखे तब्बल चाळीस उपक्रम राबविले जातात.बागकामातून श्रमसंस्कारशालेय बागेत आठवड्यातून किमान एक तास झाडांची निगा व इतर कामे करून विद्यार्थ्यांना झाडांविषयी ज्ञान दिले जाते. तसेच त्यांच्यावर श्रमदानाचे संस्कारही केले जातात.शाळा परिसर सुशोभीत करण्याबरोबरच विद्यार्थ्यांची सर्वांगीण गुणवत्ता वाढविण्यावर आमचा भर आहे. खासगी शाळांपेक्षा कितीतरी पटीने अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन पालकांचा विश्वास संपादन केला आहे. यामध्ये शिक्षकांचा वाटा मोठा आहे. विविध उपक्रमांमुळे शाळा जिल्हा पातळीवर झळकली आहे. ‘आयएसओ’ मानांकन मिळविण्याचे ग्रामस्थांचे स्वप्न आहे. - प्रशांत गंधाले, मुख्याध्यापक