शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

सातारकरांना समजेना पाण्याचं महत्त्व !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:34 IST

सचिन काकडे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : माण, खटाव तालुक्यांतील अनेक गावे पाण्यासाठी संघर्ष करीत असताना सातारा शहरात मात्र ...

सचिन काकडे।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : माण, खटाव तालुक्यांतील अनेक गावे पाण्यासाठी संघर्ष करीत असताना सातारा शहरात मात्र या उलट चित्र दिसू लागले आहे. शहरवासीयांना पालिकेकडून मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे; परंतु अनेक नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय केला जात आहे. बहुतांश नळांना तोट्याच नसल्याने पाण्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होतआहे.सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळ तर पश्चिमेकडे सुकाळ असा विरोधाभास आजही पाहावयास मिळतो. पश्चिमेकडील सातारा, वाई, जावळी, महाबळेश्वर, पाटण हे पर्जन्यवृष्टीचे तालुके म्हणून ओळखले जातात. तर पूर्वेकडील माण, खटाव, कोरेगाव, फलटण या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पश्चिमेकडील कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी या धरणांमुळे दुष्काळी भागाचा पाणीप्रश्न काहीअंशी मार्गी लागतो.उन्हाळा सुरू झाल्यापासून माण, खटाव तालुक्यांतील जनतेची पाण्यासाठीची धडपड सुरू झाली आहे. मात्र, पश्चिमेकडे या उलट चित्र दिसू लागले आहे. सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांना पहाटे, सकाळी व सायंकाळी अशा तीन टप्प्यांत पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याऐवजी नागरिकांकडून याचा अपव्यय केला जात आहे. इमारतींवर असलेल्या पाण्याच्या टाक्यात तुडुंब भरून वाहत असल्याचे चित्र नेहमीच नरजेस पडत आहे. अनेक नळांना तोट्याच नसल्याने पाण्याची नासाडी होत आहे. नळ सुरू ठेवून कपडे धुणे, गाड्या धुणे, दुकानांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी शिंपडणे अशा माध्यमातून नागरिक पाण्याची नासाडी करू लागले आहेत.पालिकेच्या वतीने यापूर्वी तोट्या नसलेले नळ कनेक्शन बंद करण्यात आले होते. परंतु अलीकडे ही कारवाई पूर्णपणे बंद झाली आहे. अनेक नळांना तोट्या नसल्याने पाण्याची नासाडी होत असताना पालिकेचेही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. पालिकेने ही बाब गांभीर्याने घ्यावी, तोट्या नसलेल्या नळ कनेक्शनवर कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.पाणी बचतीसाठी आपण हे करू शकतो..नळाखाली कपडे, भांडी धुणे टाळावे.अंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीत पाणी घ्यावे.कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन दैनंदिन वापर टाळावा.आपली वाहने धुण्यासाठी पाईपने वाहते पाणी वापरू नका.नळांना एरिएटर बसवून घ्या. त्यानेही भरपूर पाणी वाचते.परसबागेत पाण्यासाठी छोट्या बाटल्यांचा उपयोग करावा.