शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
3
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
4
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
5
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
6
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
7
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
9
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
10
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
11
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
12
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
13
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
14
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
15
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
16
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
17
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
18
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
19
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
20
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान

सातारकरांना नक्कीच पदकाची भेट देईन !

By admin | Updated: August 24, 2016 00:33 IST

ललिता बाबरचा ‘लोकमत’शी संवाद : पुढील ‘टोकियो आॅलिम्पिक’मध्ये सुवर्णपदक मिळवून ऋणातून उतराई होईन.

सातारा : ‘सातारा एक्स्प्रेस’ म्हणून देशभर नावलौकिक पावलेली ‘अर्जुन’ पुरस्कार प्राप्त धावपटू ललिता बाबर सातारकरांच्या प्रेमाने भारावून गेल्याचे सांगते. ‘२०२० मध्ये टोकियोत होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालून सातारकरांना मीही पे्रमाची भेट देईन,’ असे उद्गार तिने ‘लोकमत’शी बोलताना काढले.‘माझे मोही गाव, माण तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण देशाच्या अपेक्षांना पुरी पडण्यासाठी आॅलिम्पिक स्पर्धेत धावले. माझ्यासाठी शंभूमहादेवाकडे साकडे घालणाऱ्या माझ्या आई-वडिलांसह सर्वच सातारकरांचे मी मनापासून ऋणी राहीन,’ अशी भावना ललिताने सुरुवातीला व्यक्त केली. आॅलिम्पिकमधील कामगिरीबाबत तुझे काय मत आहे?, या प्रश्नाला उत्तर देताना ललिता म्हणाली, ‘तब्बल ३२ वर्षांपूर्वी भारताची धावपटू पी. टी. उषा आॅलिम्पिकमध्ये धावली होती, त्यानंतर मला ती संधी मिळाली. त्यामुळे मोठं दडपण होतंच. भारतीय क्रीडाप्रेमींच्या माझ्याकडून अपेक्षाही होत्या. त्या पूर्ण करण्याची मी जिद्द बाळगली होती. मी त्याप्रमाणे सराव केला. माझी कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न मी केला. अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यात यश आले; परंतु मला मेडल मिळाले नाही, याचे दु:ख आहे.’भारतीय खेळाडूंना काय कमी पडतेय?, या प्रश्नाला उत्तर देताना ललिता म्हणाली, ‘आपल्याकडे स्पर्धाच कमी आहे. आॅलिम्पिकचा सराव करत असताना सुधा सिंग आणि मी असे आम्ही दोघेच स्पर्धात्मक तयारी करत होतो. मात्र, परदेशामध्ये एका स्पर्धेसाठी तब्बल ५० जण कसून सराव करत असतात. या स्पर्धात्मक वातावरणामुळे त्यांची कामगिरी उंचावते. भारतात क्रिकेटला जितके महत्त्व दिले जाते, तितके महत्त्व अ‍ॅथलेटिक खेळांनाही दिले पाहिजे, तरच स्पर्धात्मक गुणवत्ता वाढीला लागून नक्कीच आॅलिम्पिकमधल्या पदकांची कमाई जास्त होईल.’स्पर्धेच्या काळात कुटुंबीयांशी काय बोलणे झाले? या प्रश्नावर बोलताना ललिताने सांगितले की, ‘स्पर्धेच्या आठ दिवस आधी मी कुटुंबीयांशी बोलले. माणसह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील नागरिकांना माझ्याकडून अपेक्षा आहेत, असं सांगण्यात येत होतं. स्पर्धेच्या आधी आठ दिवस मात्र मी कुटुंबीयांशी कसलाही संवाद ठेवला नाही. मी माझं लक्ष खेळावर केंद्रित केलं होतं.’ ३२ वर्षांनंतर आॅलिम्पिकच्या ट्रॅकवर धावणारी मी पहिली भारतीय धावपटू होते. याचे दडपण होतेच. इतर देशांच्या खेळाडूंच्या कामगिरीविषयी निश्चित माहिती नव्हती. विश्वविक्रम ज्यांच्या नावावर आहेत, असे धावपटू माझे स्पर्धक होते. आता या स्पर्धेचा चांगलाच अंदाज आला असल्याने मी आणखी नियोजनबद्ध पद्धतीने सराव करणार आहे.- ललिता बाबरभारतामध्ये २०१७ मध्ये होणाऱ्या एशियन गेममध्ये ती गोल्ड मेडल तर घेईलच, ३ हजार मीटर स्टिपलचेस या प्रकारातील सध्याचं रेकॉर्ड ९ मिनिट १९ सेकंद आहे. त्यात आणखी ती नक्की सुधारणा करेल, असा आम्हाला विश्वास आहे. - संजय वाटेगावकर, सचिव, सातारा जिल्हा अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक असोसिएशन.