शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

साताºयात पिवळं वादळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 22:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रामोशी समाजबांधव अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करत आहेत. शासनाकडे वारंवार मागणी करून दुर्लक्ष केले जाते, असा आरोप करत न्याय हक्कासाठी रामोशी समाजातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात हजारो समाजबांधव सहभागी झाले. त्यांनी हातात घेतलेल्या पिवळ्या झेंड्यामुळे साताºयात जणू भगवं वादळच संचारलं होतं.मोर्चात खासदार उदयनराजे भोसलेही ...

ठळक मुद्दे♦ हजारो रामोशी समाजबांधव सहभागी♦ सर्वसामान्यांच्या व्यथा सोडवू : उदयनराजे♦आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.♦तत्सम जमातींचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करावा.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रामोशी समाजबांधव अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करत आहेत. शासनाकडे वारंवार मागणी करून दुर्लक्ष केले जाते, असा आरोप करत न्याय हक्कासाठी रामोशी समाजातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात हजारो समाजबांधव सहभागी झाले. त्यांनी हातात घेतलेल्या पिवळ्या झेंड्यामुळे साताºयात जणू भगवं वादळच संचारलं होतं.मोर्चात खासदार उदयनराजे भोसलेही सहभागी झाले होते. ‘सर्वसामान्यांच्या व्यथा शासन दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू,’ अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिली.जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालयातून साजरी करावी. त्यांचे छायाचित्रे सर्व कार्यालयांना उपलब्ध करून देण्याबाबत परिपत्रक काढावे. धनदांडग्यांनी बळकावलेल्या व इनाम वर्ग अ, ब च्या वतनी जमिनी रामोशी समाजाला परत कराव्यात. भिवडी येथे क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी निधीची तरतूद करावी. समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. बेरड, रामोशी व त्यांच्या तत्सम जमातींचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करावा.कृतिसमितीचा मोर्चाआंदोलनकर्त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, इंग्रजांविरोधात सशस्त्र क्रांतीचे पहिले बंड पुकारणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती ७ सप्टेंबर २०१६ रोजी महाराष्ट्र बेडर, बेडर रामोशी समाज कृती समितीच्या वतीने राजभवन भिवडी स्मारक येथे झाली. परंतु या राष्ट्रपुरुषाच्या महान कार्याचा व क्रांतिकारी रामोशी समाजाचा या शासनाला विसर पडला आहे. निवेदन, माहिती अनेक वर्षे देऊनही कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळेच रामोशी समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या वंचित आहे. त्यामुळे बेडर, रामोशी समाज कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येत आहे.