शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांचा ‘तिसरा डोळा’ निकामी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारकरांची सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारकरांची सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले; परंतु ही यंत्रणा फार काळ तग धरू शकली नाही. ठिकठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे अनेक महिन्यांपासून बंद असून, ते केवळ शोभेपुरतेच उरले आहेत.

सातारा ही ग्रामीण भागातील नागरिकांची मुख्य बाजारपेठ आहे. विविध शासकीय कार्यालो, शाळा व महाविद्यालय, बॅँका तसेच शिक्षण संस्थांची मुख्य कार्यालये शहरात असल्याने जिल्ह्यातील नागरिकांची येथे सतत ये-जा सुरू असते. नागरिकांच्या सुरक्षेसह चोरी, दरोडे, मारामारी अशा गुन्ह्यांवर अंकुश लावण्यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाने शहरातील रहदारीच्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे लावले. प्रारंभीचे काही महिने ही यंत्रणा उत्तम पद्धतीने सुरू होती. मात्र त्यानंतर एकापाठोपाठ एक सर्वच सीसीटीव्ही बंद पडले.

लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात चोरी तसेच तसेच इतर गुन्ह्यांचे प्रमाण पूर्णत: आटोक्यात होते. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अशा घटना हळूहळू वाढू लागल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेसह भुरट्या चोरांवर वचक ठेवणारी ही यंत्रणाच कुचकामी ठरल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

(चौकट)

पालिकेकडून केवळ घोषणा

सातारा शहर सुरक्षेच्या कक्षेत आणण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची घोषणा करण्यात आली. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय सभेतही हा विषय चर्चेस आला होता. सीसीटीव्हीसाठी पाच लाखांची तरतूदही करण्यात आली. मात्र, आजतागायत हा विषय पुढे सरकलाच नाही.

(चौकट)

येथील यंत्रणा बंद

शहरातील कमानी हौद, देवी चौक, मोती चौक, मंगळवार तळे मार्ग, प्रतापगंज पेठ, राधिका चौक येथील सीसीटीव्ही कॅमेरे अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत.

(कोट)

सातारा शहराची नुकतीच हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे शहरासह वाढीव भागाच्या सुरक्षेची जबाबदारीही पालिकेच्या खांद्यावर आली आहे. पोवई नाका, शाहू चौक, मोती चौक, राजवाडा यांसह सहा ठिकाणी पालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. लवकरच या कामास प्रारंभ होईल.

- किशोर शिंदे, नगरसेवक

फोटो : ०६ जावेद १७ - मोती चौक

०६ जावेद १८ - नगरपालिका

०६ जावेद १९ - केसरकर पेठ