शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सातारच्या प्रांताधिकाऱ्याला अटक

By admin | Updated: November 20, 2014 00:19 IST

बनावट यूएलसी प्रकरण : सहीने प्रमाणपत्र दिल्याचे निष्पन्न

पुणे : राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी)ने बनावट यूएलसी प्रकरणामध्ये सातारचे प्रांताधिकारी संजय कुंडेतकर यांना बुधवारी अटक केली. यूएलसीची बनावट प्रमाणपत्रे कुंडेतकरच्या स्वाक्षरीने देण्याचे आल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे अधीक्षक बी. आर. पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २०१० मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सीआयडीची आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये कुंडेतकर हे दोषी आढळून आले आहे. दोन दिवसांपूर्वी सीआयडीने शासकीय रेकॉर्डकिपर प्रतिभा खाडे हिच्यासह तिचा पती शशिकांत खाडे या दोघांना अटक केली आहे. खाडे हिने पतीच्या मदतीने रेकॉर्डमध्ये फेरफार केल्याचेही तपासात समोर आले आहे. शशिकांत याने पत्नीच्या कामात मदत केल्यामुळे त्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या. तपासादरम्यान यूएलसी प्रमाणपत्रे ही तत्कालीन अधिकारी कुंडेतकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. बुधवारी सकाळी सीआयडीच्या एका पथकाने त्यांना सातारहून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुण्यामध्ये आणण्यात आले. पुण्यामध्ये आणल्यानंतर प्राथमिक चौकशी करुन त्यांना अटक करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.