शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या खासदाराचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:10 IST

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला धडक देऊन तो जिंकण्यासाठी ...

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला धडक देऊन तो जिंकण्यासाठी शिवसेना-भाजप युतीने जोरदार तयार केली होती. या निवडणुकीत आघाडी व युती यांच्यात जोरदार घमासान होणार, हे निश्चित आहे.यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात भाजप-शिवसेनेने माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी-काँगे्रस आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीने साताºयाची उमेदवारी प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीने यंदा खासदार उदयनराजे भोसले यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. तर त्यांच्याविरोधात भाजप-शिवसेनेने माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे.दोन्ही बाजूंनी विजयासाठी जोर लावण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँगे्रसला उदयनराजेंच्या विजयाबाबत भरवसा आहे. उदयनराजेंचे मताधिक्क्य किती असेल?, याविषयी मात्र सर्वांनाच चिंता वाटते. यंदा उदयनराजे ४ लाखांपेक्षा जास्त लीडने निवडून येतील, असे त्यांचे नजीकचे कार्यकर्ते छातीठोकपणे सांगत आहेत. त्याउलट मागील विधानसभा निवडणुकीत ६ मतदार संघातून भाजपला ४ लाखांच्या आसपास मते मिळाली होती. नंतरच्या काळात अनेकांनी भाजप-सेनेत प्रवेश केल्याने नरेंद्र पाटील यांचा विजय होईल, असे अंदाज बांधले जात आहेत. गेल्या महिनाभरापासून निकालाबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे.मतमोजणी प्रक्रिया चालते तरी कशी?सातारा: 'सातारा लोकसभा मतदार संघासाठी सातारा एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होईल. मतमोजणीच्या पारदर्शकतेसाठी मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभानिहाय २० टेबल ठेवण्यात येणार आहेत. एकूण २३ फेºया झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल.पोस्टल मतदान मोजणीपोस्टल मतमोजणी टपाली व सैनिक मतमोजणीसाठी प्रत्येक सहा टेबलवर मतमोजणी होणार आहे. सुरुवात टपाली मतांच्या मोजणीने होईल. सैनिक मतदारांचे पोस्टल मतदानाच्या लखोट्यावरील क्यूआर कोड स्कॅनिंग करण्यासाठी २० टेबलची मांडणी करण्यात येणार आहे.व्हीव्हीपॅटवरील चिठ्ठ्यांची मोजणीसातारा लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ढोबळ पद्धतीने निवडलेल्या ५ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटवरील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार आहे. त्या विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणी कक्षामध्ये सहायक निवडणूक अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली मोजणी करण्यात येणार आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची मत जुळवली जाणार आहेत.२0 मतमोजणी प्रतिनिधीप्रत्येक विधानसभा मतदार संघात ईव्हीएम मतमोजणीकरिता २० मतमोजणी प्रतिनिधी याप्रमाणे एकूण १२० निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्ष, बारकोड रीडिंग कक्षात प्रत्येकी एक, टपाली मतपत्रिका मतमोजणीसाठी सहा असे एकूण १२८ प्रतिनिधी नियुक्त केले आहेत.फेरीनिहाय चित्र स्पष्टसातारा लोकसभा मतदार संघातील वाई-२३, कोरेगाव-१८, कºहाड उत्तर-१७, कºहाड-दक्षिण-१६, पाटण-२०, सातारा-२३ अशा फेºया होणार आहेत. कºहाड दक्षिणमध्ये केवळ १६ मशीन असल्याने सर्वात आधी त्यांचा निकाल लागणार आहे. त्यानंतर कºहाड उत्तर, कोरेगाव, पाटण, सातारा आणि वाई असा निकाल लागणार आहे.