शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याची लावण्यतारका सातासमुद्रापार!

By admin | Updated: July 25, 2016 00:32 IST

पूनम कुडाळकर : इजिप्त, इराक अन् इराणमध्ये दिवाळीत होणार नृत्याचा कार्यक्रम

जगदीश कोष्टी / सातारा नऊवारी साडी, केसांचा अंबाडा घातलेली लावणीसम्राज्ञी व्यासपीठावर आल्यावर रसिकांच्या काळजाचा ठोका चुकलाच म्हणून समजा; पण कुडाळ येथील पूनम कुडाळकर हिच्या अदाकरीने पुरुषांबरोबरच महिलांची मने जिंकली आहे. साताऱ्याच्या ‘लावण्यतारका’चा गवगवा सातासमुद्रापार पोहोचला आहे. दिवाळीमध्ये इराक, इराण अन् इजिप्तमध्ये कार्यक्रम होणार आहेत. जावळी तालुक्यातील पूनम जावळे ही महाराष्ट्रातील लावणी रसिकांसाठी पूनम कुडाळकर या नावाने परिचित आहे. पूनम सातवीत असताना आॅक्रेस्ट्रॉच्या माध्यमातून व्यासपीठावर पदार्पण केले. त्यानंतर काही वर्षांतच तिने या क्षेत्रात चांगले नाव कमविले. पूनमची आई विठाबाई जावळे या चांगल्या नृत्यंगणा आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून तिला नृत्याचे धडे मिळाले. तर मावशी मंगल जावळे या प्रसिद्ध तमाशा कलावंतीण आहे. त्या चांगल्या पद्धतीने गाणेही गातात. त्यामुळे गाणे अन् नृत्याचे गुरू घरातून लाभले. मावशीचा कोल्हापुरात आॅक्रेस्ट्रा होता. यामधून पूनमने नृत्य करण्यास सुरुवात केली. चार वर्षे कोल्हापूर गाजवल्यानंतर तिने पुण्यामध्ये नृत्याचे प्रशिक्षण घेतले. विदर्भ, मराठवाडा, खाण्देशबरोबरच संपूर्ण राज्यभर तिचे सुमारे दोन हजार प्रयोग झाले आहेत. आंध्रप्रदेशच्या सीमेवर मराठी माणसांसाठी केलेला कार्यक्रम विशेष गाजला. निपाणीमध्ये महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. केवळ महिलांसाठी कार्यक्रम असेल तर ‘लावण्यतारका’ तर सर्वांसाठी खुला असल्यास ‘तुमच्यासाठी कायपण’ या नावाने ती प्रयोग करते. तिने आत्तापर्यंत दोन चित्रपटांमध्ये कला सादर केली आहे. ‘भावाची लक्ष्मी, व्वा पैलवान’ या सिनेमात तिने काम केले आहे. तर पंधरा लावण्यांचा सीडी अल्बम बाजारात आला आहे. अविस्मरणीय ‘शांताबाई...’ ‘शांताबाई’ या गाण्याने सर्वांनाच वेड लावले आहे. पण, या गाण्याशी पूनम कुडाळकरचा जवळचा संबंध आला आहे. हे गाणे नुकतेच बाजारात आले तेव्हा दहीहंडीच्या कार्यक्रमात पूनमला या गाण्यावर नाचविण्याचा निर्णय नृत्यदिग्दर्शक योगेश देशमुख यांनी घेतला. संबंधित संगीत कंपनीची परवानगी घेऊन वेगळा पेहराव व गॉगल घालून नृत्य केले. पुढे या कंपनीने हीच थीम वापरून व्हिडीओ बाजारात आणला.