शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

मराठी साहित्य संमेलनांवर सातारी सारस्वतांचा प्रभाव!

By admin | Updated: September 12, 2015 00:10 IST

इतिहासाला उजाळा : ११ सातारकरांनी पटकावले अध्यक्षपद

सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर याआधी ११ सातारकर सारस्वतांनी आपली मोहोर उमटवली आहे. गतवर्षी अरुण गोडबोले यांनी या पदासाठी लढत दिली होती, आताही अध्यक्षपदाच्या रिंगणात कवी श्रीनिवास वारुंजीकर हे सातारकर लढणार आहेत. १९०५ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रघुनाथ पांडुरंग करंदीकर (सातारा) हे होते. नरसिंह चिंतामन केळकर हे बडोदे येथे १९२१ मध्ये झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष होते. औंधचे राजे भगवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी हे इंदोर येथे १९३५ झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले होते. चाफळचे यशवंत दिनकर पेंढारकर हे १९५० मध्ये मुंबई संमेलनाचे अध्यक्ष होते. पालीचे श्रीकृष्ण केशव क्षीरसागर यांनी १९५९ च्या मिरज संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.पूर्वी सातारा जिल्ह्यात असणाऱ्या माडगुळे गावचे गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) १९७३ मध्ये यवतमाळ संमेलनाचे अध्यक्ष होते. माडगुळे गावचेच दुसरे सुपुत्र व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे १९८३ मध्ये अंबेजोगाई संमेलनाचे अध्यक्ष होते.आटपाडीचे शंकरराव रामचंद्र खरात हे १९८४ मध्ये झालेल्या जळगाव संमेलनाचे अध्यक्ष होते. रहिमतपूरचे वसंत शंकर कानेटकर यांनी १९८८ मध्ये ठाणे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. सातारा शहरातील ना. सं. इनामदार यांनी १९९७ च्या नगर संमेलनाचे तर कऱ्हाडचे कवी वसंत वामन बापट यांनी १९९९ च्या मुंबई संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. दरम्यान, गतवर्षी सातारचे साहित्यिक अरुण गोडबोले यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती; पण त्यात त्यांना यश आले नव्हते. यावर्षीही सातारचे श्रीनिवास वारुंजीकर यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. (प्रतिनिधी)वारुंजीकरांचा फेसबुकद्वारे प्रचारअध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचाराची मोहीम श्रीनिवास वारुंजीकर यांनी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचाही आधार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी प्रथम फेसबुकवर पेजही तयार करण्यात आले असून, त्यावर वारुंजीकर यांनी आपली उमेदवारीमागील प्राथमिक भूमिकाही मांडली आहे.