शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मोर्चात सातारकरांचे औदार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुंबईत झालेल्या न भूतो न भविष्यती अशा मराठा मोर्चातील हजारो मावळ्यांच्या खाण्या-पिण्यासह निवाºयाची सोय पडद्यामागे राहून काम करणाºया वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशनने केली होती. विशेष म्हणजे, या आॅर्गनायझेशनमध्ये पाचशे पेक्षाही अधिक कार्यकर्ते सातारा जिल्ह्यातील असून, या ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण पिसाळ हे सध्या ठाणेवासीय असले तरी मूळचे कोरेगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुंबईत झालेल्या न भूतो न भविष्यती अशा मराठा मोर्चातील हजारो मावळ्यांच्या खाण्या-पिण्यासह निवाºयाची सोय पडद्यामागे राहून काम करणाºया वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशनने केली होती. विशेष म्हणजे, या आॅर्गनायझेशनमध्ये पाचशे पेक्षाही अधिक कार्यकर्ते सातारा जिल्ह्यातील असून, या ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण पिसाळ हे सध्या ठाणेवासीय असले तरी मूळचे कोरेगाव तालुक्यातील किन्हईचे.वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन ही मुख्यत्वे मराठा तरुणांच्या शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी कार्य करणारी संस्था असून, मुंबई क्रांती मोर्चातील मराठा बांधवांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्यासाठी ही कार्यरत झाली.या कार्यात वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन संघटनेचे जितू काकडे, रुपाली पाटील, विजय दांगट, अ‍ॅड. उदय चव्हाण, जयदीप पाटील, अवधूत सूर्यवंशी, जगदीश पाटील, राज पाटील, समाधान पवार, दीपक धावणे, प्रवीण पिसाळ, शीतल चोपडे, डॉ. कांचन पाटील, डॉ. मानसी पवार तसेच वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रवीण पिसाळ व अन्य अनेक सहकाºयांनी रात्रंदिवस सहभाग दर्शविला.पुण्यातील एका मिनरल वॉटर कंपनीच्या मदतीने आणि अतुल पिसाळ यांच्या सहकार्याने मुंबई मराठा मोर्चाच्या दिवशी २०,००० पाणी बॉटल्सचे मोफत वाटप करण्यात आले. रेल्वेने मोर्चासाठी मोठा जमाव छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे येणार हे ओळखून प्रवीण पिसाळ यांनी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ५,००० वडापावचे मोफत वाटप केले.दीपक धावणे यांनीही अजून एका ठिकाणी मोफत पाणी वाटप करून कार्याला हातभार लावला. मराठा क्रांती मोचार्साठी वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन मार्फत झालेल्या या भरीव कामगिरीचे मराठा समाजातील बांधवांनी भरभरून कौतुक केले. वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन सारख्या ‘बांधणीस्वरूप’, ‘क्रियाशील’ आणि ‘सकारात्मक’ कार्य करणाºया संघटनेला मराठा बांधवांनी सहकार्य करायलाच हवे.मुक्कामासाठी नवी मुंबईत सोय...मोर्चासाठी लाखो मराठा बांधव मुंबईत येणार या विचाराने वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन संस्थेने आपल्या मराठा बांधवांसाठी मोफत राहण्याची, नाश्ता-भोजनाची तसेच पाण्याची व्यवस्था करण्याचे ठरविले. किमान २५००-३००० लोक राहू शकतील, अशा नवी मुंबईच्या नेरुळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनमध्ये व्यवस्था करण्यात आली. ८ आॅगस्टच्या संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत मराठा बांधवांचे लोंढे हॉलवर येत होते. अगदी एका वेळी ६ बसेस भरून त्या रात्री लोक राहण्यासाठी आले होते. तसेच अनेक लहान मोठ्या गाड्या भरून लोक रात्रभर येत होते. या सर्वांची व्यवस्थित सोय याठिकाणी करण्यात आली.