शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

भर पुरातही साताऱ्याची पाणी योजना अखंडित सुरू -: संजय गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 23:49 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणी योजना कृष्णा नदीवर आहे. पश्चिम भागात मोठा पाऊस झाल्यानं कृष्णा नदीला पूर आला होता. आम्ही उपाययोजना राबविली. - संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

ठळक मुद्देशुद्ध पाणी पुरवठ्यासाठी आग्रही

सागर गुजर।यंदाच्या पावसाने भलताच कहर केला. जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पूर आला. नदीकाठच्या पाणी योजना पुराच्या पाण्याखाली गेल्या. आजच्या घडीला अनेक योजनांमध्ये गाळ साठला आहे; परंतु सातारा शहराचा पूर्वभाग तसेच आजूबाजूच्या उपनगरांना पाणीपुरवठा करणारी कृष्णा नदीवरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणी योजना अखंडितपणे सुरू राहिली. प्राधिकरणचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्त अभियंत्यांनी दूरदृष्टी दाखवून पावसाळ्यात युद्धपातळीवर उपायोजना आखल्याने हे शक्य झाले.

प्रश्न : पूर परिस्थितीत काय उपाय केले?उत्तर : साताºयाची पाणी योजना ही माहुली येथील कृष्णा नदीवर आहे. यंदा नदीला मोठा पूर आला होता. पंपिंग हाऊसमध्ये पाणी गेले असते तर अनेक दिवस ही योजना बंद पडली असती; परंतु आम्ही पंपिंग हाऊसला धोका निर्माण होऊ नये, यासाठी तसेच पंपिंग हाऊसमध्ये पाणी शिरू नये, याची आधीच खबरदारी घेतली होती.

प्रश्न : पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण काय?उत्तर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ग्राहकांकडून दरवर्षी सहा ते सात कोटी रुपयांची पाणीपट्टी वसुली होत होती. मी आल्यानंतर वसुलीवर भर दिला. विशेषत: थकबाकी वसुली केली. गतवर्षी तब्बल ११ कोटींचा वसूल करून आम्ही तो शासनाच्या तिजोरीत भरला आहे. विकासकामांसाठी पैसे महत्त्वाचे असतात. थकित रकमा वसूल झाल्याने आम्ही जलसंपदाचे बिल भरू शकलो.

प्रश्न : जलसंपदाची देणी दिली का?उत्तर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणी योजना ही नदीवर आहे. योजनेसाठी पाणी वापरत असल्याने त्याची पाणीपट्टी जलसंपदा विभागाला भरावी लागते. सन २००६ ते २०१९ या कालावधीतील थकलेली १ कोटी ४५ लाखांची वसुली आम्ही भरली आहे. एका रुपयाचाही देणे राहिलेले नाही. शासकीय कार्यालयांकडील थकबाकी वसूल केल्याने हे शक्य झाले आहे.‘इंजिनिअर डे’ च्या निमित्ताने सत्कारमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सातारा कार्यालयात कार्यकारी अभियंता म्हणून काम करणाºया संजय गायकवाड यांनी आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. नेहमीच्या कामासोबतच शासकीय महसूल मोठ्या प्रमाणावर जमा करून जलसंपदा विभागाची असलेली थकबाकी ही त्यांनी पूर्ण भरल्याने ‘इंजिनिअर्स डे’ च्या निमित्ताने पुण्यात त्यांचा विशेष सत्कार झाला.थकबाकी वसुलीप्राधिकरणाच्या माध्यमातून सातारा शहराचा पूर्वभाग शहरालगतची मोठी उपनगरे तसेच काही ग्रामपंचायतींच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जातो. यात शासकीय इमारतींचाही समावेश आहे. ही वसुली करण्यावर भर दिला. शासकीय कार्यालतयांकडे अनेक दिवसांची थकबाकी होती. ती वसूल करण्यावर भर दिला. त्यात यशही आले. आता थकबाकी राहिली आही.

टॅग्स :water transportजलवाहतूकSatara areaसातारा परिसर