शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

साताऱ्यात दोन मटकाबहाद्दर तडीपार

By admin | Updated: February 27, 2016 00:46 IST

अभिनव देशमुख यांची कारवाई

सातारा : समाजकंटकांना तडीपार करण्याचा पोलिसांचा धडाका सुरूच असून, सातारा आणि मेढा हद्दीत बेकायदा मटका चालविणाऱ्या टोळीप्रमुखासह दोघांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. जब्बार जमाल पठाण (वय ३८) आणि जैनुद्दीन जमाल पठाण (४५) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे असून, जब्बार हा टोळीप्रमुख आहे. सातारा शहर, तालुका आणि जावळी तालुक्यात ही टोळी बेकायदा मटका चालवीत होती. त्यांच्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल झाले असून, प्रतिबंधात्मक कारवाई करून अनेकदा त्यांना सुधारण्याची संधी देण्यात आली होती. तथापि, त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती आणि सर्वसामान्यांना उपद्रव होऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी लोकांमधून होत होती. त्यांच्याकडून जिल्ह्याच्या हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून टोळीतील दोघांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची सुनावणी होऊन डॉ. देशमुख यांनी शुक्रवारी (दि. २६) या दोघांना तडीपार करण्याचा आदेश दिला. तडीपारीचा अवधी एक वर्ष असून, या कालावधीत त्यांना जिल्हा हद्दीत प्रवेश करता येणार नाही. आदेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर ४८ तासांत दोघांना जिल्हा सोडण्यास सांगण्यात आले.