शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सातारा ‘स्वाभिमानी’ला फलटण, ‘रासप’ला माण

By admin | Updated: September 1, 2014 23:02 IST

महायुती जागावाटप : बाकीच्या सहा मतदारसंघांचा निर्णय प्रतीक्षेत

सातारा : माण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाकडे, तर फलटण विधानसभा मतदारसंघ स्वाभिमानी पक्षाला मिळणार असल्याचे आज, सोमवारी स्पष्ट झाले. ‘रासप’चे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला, तर ‘स्वाभिमानी’चे सदाभाऊ खोत यांनी या अनुषंगाने बोलण्याचे टाळले. दरम्यान, माण आणि फलटणचा विषय निकालात निघाल्यामुळे आता जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपकडे कोणते मतदारसंघ राहणार याकडेही अनेकांच्या नजरा आहेत.जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. ‘रासप’ आणि ‘स्वाभिमानी’ महायुतीचे घटक पक्ष आहेत. गत निवडणुकीत हे दोन्ही पक्ष सेना-भाजपबरोबर नव्हते. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जागावाटपाच्या अनुषंगाने गेले काही दिवस बैठका सुरू आहेत. ‘रासप’ने माण, फलटण तर ‘स्वाभिमानी’ने फलटण, कोरेगाव, कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तर या चार विधानसभा मतदारसंघांवर दावा केला होता. त्यातच भाजपने पूर्वीचे तीन आणि नव्याने दोन असे पाच मतदारसंघ मागितले होते. परिणामी महायुतीतील जागावाटपाचा ‘गोंधळात गोंधळ’ सुरूच होता.पहिल्या टप्प्यात ‘रासप’ आणि ‘स्वाभिमानी’मध्ये असणारा /सातारा जिल्ह्यातील अंतर्गत विषय निकालात काढण्यात काही प्रमाणात दोन्ही पक्षांच्या नेत्यांना यश आले आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या दोन्ही मतदारसंघांवर ‘स्वाभिमानी’ ठाम होती. मात्र, जानकर यांनी जागावाटप करताना ‘स्वाभिमानी’ला जर पंढरपूर हवा असेल, तर फलटण सोडावा लागेल आणि फलटण हवा असेल, तर पंढरपूर सोडावा लागेल, अशी भूमिका मांडली. त्यामुळे ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांनी पंढरपूर सोडत फलटणला प्राधान्य दिल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.चारही इच्छुकांशी चर्चा झालीय : जानकर‘माण विधानसभा मतदारसंघामधून ‘रासप’ची उमेदवारी मिळावी म्हणून माजी आमदार सदाशिवराव पोळ, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, शेखर गोरे, रणजितसिंह देशमुख यांनी भेट घेऊन चर्चा केली होती. माण आता आम्हालाच मिळणार असल्यामुळे आम्ही आमचा उमेदवार लवकरच जाहीर करू,’ असे महादेव जानकर यांनी सांगितले.आगवणेंच्या छातीवर ‘स्वाभिमानी’चा बिल्लाफलटण येथील काँग्रेसचे कार्यकर्ते दिगंबर आगवणे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करणार असल्याची माहिती ‘स्वाभिमानी’चे नेते सदाभाऊ खोत यांनी दिली. फलटण येथे उद्या, मंगळवारी, सायंकाळी शेतकरी मेळावा होत असून, येथेच आगवणे यांचा प्रवेश होणार आहे. दरम्यान, ‘आगवणे स्वाभिमानी पक्षात नव्हे, तर आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करीत असल्याची बाब लक्षात घ्या,’ असे सांगण्यासही खोत विसरले नाहीत.