शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 साताऱ्यात दोन राजेंचे मनोमिलन अन् महायुतीचा कडवा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:19 IST

सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा-जावळी विधानसभा मतदार संघात आचारसंहिता लागण्याआधी रोचक घडामोडी घडल्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा-जावळी विधानसभा मतदार संघात आचारसंहिता लागण्याआधी रोचक घडामोडी घडल्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवसेनेचे विद्यमान उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासोबत बसून मिसळ खाल्ली होती. आता मात्र हेच शिवेंद्रसिंहराजे आपले बंधू उदयनराजे भोसले यांच्यासाठी मतदार संघात फिरत आहेत.सातारा शहरात उदयनराजे भोसले यांच्या आघाडीची सत्ता आहे. तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आघाडीला विरोधात बसावे लागले होते. मात्र दोन्ही आघाड्यांत पुन्हा मनोमिलन झाले असल्याने उदयनराजेंसाठी पोषक वातावरण निर्मिती होईल, अशी चिन्हे आहेत. तरीही अद्याप दोन्ही आघाड्यांच्या नगरसेवकांनी ज्या ताकदीने प्रचार करायला हवा, तो होताना दिसत नाही. आपल्या प्रचाराला उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे हवेत; मात्र त्यांच्यासाठी उन्हातान्हात फिरताना अंग चोरणारी मंडळीच पाहायला मिळत आहेत.जावळी तालुक्यात शिवसेनेला पहिल्यापासूनच पोषक स्थिती आहे. मात्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोन वेळा मताधिक्य घेऊन राष्ट्रवादीचे वातावरण तयार केले आहे. ते उदयनराजेंसाठी पोषक ठरणारे आहे.युती । प्लस पॉर्इंट काय आहेत?सातारा नगरपालिकेच्या सत्तेत भाजपने शिरकाव केला आहे. भाजपचे ६ नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेलाही दोन गटांत भाजपने वर्चस्व मिळवले होते. जावळीतही भाजपमध्ये इनकमिंग झाले.युती । विक पॉर्इंट काय आहेत?या मतदार संघात शिवसेना-भाजप एकसंध दिसत नाही. वरिष्ठ पातळीवर युती झाली असली तरी एकोप्याने निवडणूक लढण्यासाठी जे घट्ट बंध पाहिजेत, ते दिसत नाहीत. रिपाइंची भूमिकाही गुलदस्त्यात आहे.आघाडी । प्लस पॉर्इंट काय आहेत?सातारा-जावळी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच पालिकांतील सत्तेचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला होऊ शकतो.आघाडी । विक पॉर्इंट काय आहेत?शहरातील सत्तेत राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आघाडी विरोधात आहेत. उदयनराजेंच्या प्रचारासाठी नगरविकास आघाडी अंग झाडून कामाला लागल्याचे दिसून येत नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक