शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या खंडणीबहाद्दरांचा बंदोबस्त करणार

By admin | Updated: January 30, 2015 23:18 IST

विजय शिवतारे : बिल्डरांना दिलेल्या उत्खननाच्या नोटीसा परत घेणार

सातारा : ‘सातारा शहराच्या विकासामध्ये बिल्डर, उद्योजक व व्यापारी यांचे योगदान महत्त्वाचे आहे. नियमबद्ध काम करणाऱ्या बिल्डरांना उत्खननासाठी लाखो रुपयांचा दंड केल्याचा अजब प्रकार साताऱ्यातच मी पाहिला आहे. नियमात काम करणाऱ्या बिल्डरांना उत्खननासाठी बजावण्यात आलेली नोटीस जिल्हाधिकाऱ्यांना परत घेण्याची सूचना देण्यात येणार आहेत. तसेच बिल्डर, डेव्हलपर व उद्योजकांना त्रास देणाऱ्या खंडणीबहाद्दरांचा बंदोबस्त करणार आहे,’ असे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले. येथील के्रडाई सातारा शाखा व बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया सातारा शाखेच्यावतीने पालकमंत्री शिवतारे यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी शिवतारे बोलत होते.के्रडाई सातारा शाखा व बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडिया सातारा शाखेच्यावतीने क्रिडाई शाखेचे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, उपाध्यक्ष कमलेश पिसाळ यांनी शिवतारे यांचे स्वागत केले.पालकमंत्री शिवतारे यांनी विविध विषयांवर सखोल चर्चा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘सातारा शहर व परिसरातील बिल्डर, डेव्हलपर, उद्योजक व व्यापारीवर्ग यांना खंडणीबहाद्दरांचा त्रास होत असून या खंडणी बहाद्दरांचा ताबडतोब बंदोबस्त करणार आहे. त्यासाठी येत्या काही दिवसात बिल्डर, डेव्हलपर, उद्योजक, व्यावसयिक यांची एकत्रित बैठक जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत आयोजित करणार आहे. यामध्ये खंडणीबहाद्दरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणार आहे.महाराष्ट्रातील अनेक छोट्या शहरांचा वेगाने विकास होत असून सातारा जिल्ह्याचा येत्या काही काळात आधुनिक सातारा असा चेहरा समोर आणण्यासाठी सातारा शहर व जिल्ह्यात विविध उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विकासामध्ये सर्वात मोठा बिल्डर, डेव्हलपर यांचा वाटा आहे, असेही त्यांनी सांगितले.’यावेळी आ. शंभूराज देसाई, श्रीधर कंग्राळकर, कमलेश पिसाळ, सुधीर शिंदे, सुधीर घार्गे, बाळासाहेब ठक्कर, अभिजित पाटील, सुधीर ठोके, मंगेश वाडेकर, जितेंद्र भोसले, सलीम कच्छी, राहुल वखारिया, पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘लोकमत’चे कौतुक...‘लोकमत’ने साताऱ्याच्या बिल्डरांना येणाऱ्या अडचणीविषयी सातत्याने लेखन केले होते.‘लोकमत’च्या या भूमिकेचे यावेळी बिल्डरांनी शिवतारे यांच्यासमोर कौतुक केले. ‘सातारा शहराचा विकास करण्यासाठी शहराची हद्द वाढ होणे गरजेचे असून मुख्यमंत्र्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावणार आहे. त्याप्रमाणे सातारा शहरात डेव्हलपमेंट प्लॅन लागू करणे गरजेचे असून यासंबंधातील आर. पी. कमिटीची नव्याने स्थापना करून या समितीमध्ये बिल्डर, आर्किटेक्ट व व्यापारी यांचे प्रतिनिधी नेमणार आहे. यासाठी के्रडाई व बिल्डर्स असोसिएशनने शहराचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने करता येईल यासाठी आराखडा तयार करावा,’असे आवाहन शिवतारे यांनी केले.