शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

मुख्यमंत्र्यांच्या रडारवर साताऱ्याचं राजकारण

By admin | Updated: May 24, 2017 23:06 IST

मुख्यमंत्र्यांच्या रडारवर साताऱ्याचं राजकारण

 !लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यात महिनाभरातला तिसरा दौरा आखला आहे. सोमवारी (दि. २९) मुख्यमंत्री पुन्हा जिल्ह्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील सोहळ्यात अनेक दिग्गज मंडळींचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचं कमळ फुलविण्याचा विषय मुख्यमंत्र्यांनी भलताच मनावर घेतल्याचं स्पष्टपणे दिसू लागलंय. वाई-महाबळेश्वर-खंडाळा, सातारा, कोरेगाव, माण-खटाव मतदारसंघांत भाजपच्या मंत्र्यांनी वेळोवेळी उपस्थिती लावली आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये मनोज घोरपडे यांना भाजपने बळ दिले आहे. याच कऱ्हाड उत्तरमधील धैर्यशील कदम यांचीही मागील दौऱ्यात मुख्यमंत्र्यांशी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. आता कऱ्हाड दक्षिणमध्ये काँगे्रस, राष्ट्रवादीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिग्गज लोक भाजपमध्ये खेचून घेण्याचे सत्र सुरू झाले आहे. सोमवारीही ‘पक्ष प्रवेश’ हाच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. कऱ्हाड दक्षिण, फलटण विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनेकांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, भाजपमध्ये कोण-कोण प्रवेश करणार? ही बाब मात्र अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्याशी संपर्क साधला असता, ‘नावे ऐनवेळी कळतील,’ असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. मलकापूरला वेध नगरपरिषदेचे !कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मलकापूर नगरपंचायतीचा टापू आजपर्यंत पृथ्वीराज चव्हाण यांच्या काँग्रेसचा हुकमी एक्का समजला गेला. हे ध्यानात घेऊनच सत्ताधारी भाजपने मलकापूरवर लक्ष केंद्रित केले असून, ही नगरपंचायत लवकरच नगरपालिकेत रूपांतरित होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: मलकापूर येथे शिवार सभा घेणार आहेत.